शास्त्रज्ञ, अधिकारी, लोकप्रतिनिधी बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:01:24+5:30

आफ्रिका खंडात हिरव्या पिकांची पाने कुरतडून मोठे नुकसान करणाऱ्या टोळधाडीची नोंद महाराष्ट्रात १९९३ मध्ये धुळे येथे करण्यात आली होती. टोळधाड अर्थात नाकतोडे हे झुंडी (स्वर्म) ने फिरतात. एका स्वर्ममध्ये सहा ते सात कोटी कीटक असू शकतात. वर्धा जिल्ह्यातील नदीकाठावरील हिरवे गवत या टोळधाडीत नष्ट झाल्याची माहिती विभागीय सहसंचालकांनी दिली.

Scientists, officials, people's representatives on the agriculture | शास्त्रज्ञ, अधिकारी, लोकप्रतिनिधी बांधावर

शास्त्रज्ञ, अधिकारी, लोकप्रतिनिधी बांधावर

googlenewsNext
ठळक मुद्देसंत्राबागेची पाहणी : मोर्शी, वरूड तालुक्यानंतर वर्धा, नागपूर जिल्ह्याकडे टोळधाडीचा रोख; माहिती कळविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड/मोर्शी : विदर्भात पहिल्यांदा धडकलेल्या टोळधाडीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी व शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी मोर्शी, वरूड तालुक्यांमध्ये सोमवारी दिवसभर आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे शेताच्या बांधावर होते.
पाकिस्तानच्या वाळवंटातून राजस्थानचे वाळवंट आणि तेथून मजल-दरमजल करीत मोर्शी, वरूड तालुक्यात टोळधाड दाखल झाली. यानंतर या झुंडीने काटोल व वर्धाकडे रोख केला. मोर्शी, वरूड तालुक्यातील  शिंगोरी, पाळा, भिवकुंडी, सालबर्डी, घोडदेव, भाईपूर या गावातील शेतकऱ्यांना शेतात पिके फारशी नसल्याने नुकसानाचे प्रमाण फारसे नाही, असे विभागीय कृषी सहसंचालकांनी सांगितले.
मोर्शी व काटोल तालुक्यात काही ठिकाणी ही टोळधाड विसावल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रॅक्टर माऊंट स्प्रेअरने क्लोरोपायरीफॉसची फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार सोमवारी रात्रभर ही कार्यवाही करण्यात आली. याशिवाय टोळधाड विसावण्याची शक्यता असल्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना तण, टायर वा अन्य धूर करणारी वस्तू पेटवायचा तसेच डब्यांसह इतर ध्वनी उत्पन्न करणारी साधने वाजविण्याचा सल्ला देण्यात आला.
आफ्रिका खंडात हिरव्या पिकांची पाने कुरतडून मोठे नुकसान करणाऱ्या टोळधाडीची नोंद महाराष्ट्रात १९९३ मध्ये धुळे येथे करण्यात आली होती. टोळधाड अर्थात नाकतोडे हे झुंडी (स्वर्म) ने फिरतात. एका स्वर्ममध्ये सहा ते सात कोटी कीटक असू शकतात. वर्धा जिल्ह्यातील नदीकाठावरील हिरवे गवत या टोळधाडीत नष्ट झाल्याची माहिती विभागीय सहसंचालकांनी दिली.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तालुका कृषी अधिकारी उमेश आगरकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी प्रक्षेत्राचे शास्त्रज्ञ अनिल ठाकरे, नागपूर येथील कृषिशास्त्रज्ञ ठाकरे, जैस्वाल आदी यावेळी उपस्थित होते.

शेतात फिरवा सायलेंसर काढलेला ट्रॅक्टर
राजुरा बाजार : जिल्ह्यात मोर्शी वरुड तालुक्यांमध्ये टोळधाडीचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना सतर्कतेचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. कृषी विद्यापीठांनी या किडीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपायोजना सांगितल्या आहेत. त्यानुसार, शेतकºयांनी शेतात वेगवेगळ्या ठिकाणी कडुनिंब, धोत्रा, इतर तण किंवा पालापाचोळा जळून धूर तयार करावा. शेकोट्या पेटवाव्यात. त्या धुरामुळे टोळधाड शेतात बसणार नाही. शेतात टिनाचे डबे, प्लास्टिकचे बॉटस, इतर साहित्याच्या साहाय्याने मोठे आवाज काढावेत. ट्रॅक्टरचे सायलेन्सर काढल्यावरसुद्धा फार मोठा आवाज होतो . सायलेन्सर काढलेले ट्रॅक्टर शेतात फिरविल्यामुळेसुद्धा ही टोळधाड शेतात शक्यतोवर बसणार नाही. क्लोरोपायरीफॉस ५० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ५ टक्के प्रमाण असलेली कीटकनाशके ३० ते ४० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पॉवर स्प्रे किंवा ट्रॅक्टर माऊंट ब्लोअरद्वारे सर्व शेतकऱ्यांनी शेतात एकत्रित फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व मोर्शी उपविभागीय कृषी अधिकाºयांनी केले आहे.

टोळधाडीला हुसकावून लावण्यासाठी कुठल्याही वाद्याचा मोठा आवाज शेतकऱ्यांनी शिवारात करावयाचा आहे. याशिवाय धूर होईल असे काहीतरी पेटविणेदेखील फायद्याचे ठरणारे आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या भागात टोळधाड असल्यास त्याची माहिती कृषी विभागाला कळवावे.
- सुभाष नागरे
विभागीय कृषी सहसंचालक

Web Title: Scientists, officials, people's representatives on the agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती