शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

स्कूल व्हॅन धावतात फेरतपासणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:36 IST

आरटीओ परवानाधारक ६५० स्कूल व्हॅन व स्कूल बसेस आहेत. मात्र, यंदा अनेक चालकांनी व्हॅनची फेरतपासणी केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न पडला असून, चिमुकल्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देआरटीओची कारवाई केव्हा? : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीओ परवानाधारक ६५० स्कूल व्हॅन व स्कूल बसेस आहेत. मात्र, यंदा अनेक चालकांनी व्हॅनची फेरतपासणी केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न पडला असून, चिमुकल्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यात शेकडो स्कूल व्हॅन व बसेस रस्त्यावरून धावणार आहे. यामधूनच रोज हजारो विद्यार्थी शाळेत जातात. त्यामुळे अशा नियमबाह्य धावणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करणे अपेक्षित आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात आरटीओकडून स्कूल व्हॅनची फेरतपासणी व व्हॅनचे फिटनेस करून घेणे अनिवार्य आहे. स्कूल व्हॅनची फेरतपासणी करून घेतली आहे का? स्कूलबसचा स्पिड नियमानुसार बांधला आहे काय, असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. २०११ च्या स्कूल व्हॅन नियमावलीनुसार फिटनेस व न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी फेरतपासणी करून घेणे गरजेचे आहे. जर स्कूल बसला आग लागल्यास आपत्कालीन व्यवस्था आहे का? अनेक फेरतपासणीशिवाय वाहने धावणार असल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगतीला लागला आहे. धावत्या स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांनी खिडकीतून डोकावून पाहू नये, खिडकीच्या मधात चारही बाजूला रॉड असणे आवश्यक्ता आहे. वाहन चालविताना ४० च्यावर स्पिडने वाहन चालवू नये, स्कूल व्हॅन किंवा बसमध्ये आग लागल्यास सुरक्षितता म्हणून ते विझविण्यासाठी अग्निरोधक यंत्रे असणे अनिवार्य आहे. जेवढे प्रादेशिक परिवहन विभागाचे पासिंग आहे. तेवढीच विद्यार्थी संख्या चालकाने शाळेत नेणे आवश्यक आहे.वाहनामध्ये आरटीओने स्पिड गर्वनल बसविले असल्याने आरटीओला स्पिड कळते.पाच लाखांवर विद्यार्थी घेतात शिक्षणमाध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये १ ते १२ पर्यंत अंदाजे ५ लाख २९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती शिक्षणाधिकाºयाच्यावतीने प्राप्त झाली आहे. यामध्ये माध्यमिकच्या ६१८ शाळांमध्ये अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. प्राथमिकच्या १६०० शाळांमध्ये अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. हजारो विद्यार्थी स्कूल व्हॅनमधून प्रवास करतात. त्यामुळे नियमात वागणे गरजेचे आहे.जिल्ह्यात ६५० स्कूल व्हॅन व बसेसअमरावती जिल्ह्यामध्ये आरटीओकडून परवाना घेतलेल्या ६५० स्कूल व्हॅन व बस आहेत. मात्र, यापैक ी अनेक बसच्या चालकांनी यंदा स्कूल व्हॅनची फेरतपासणी करून घेतली नाही. त्यामुळे कारवाई अपेक्षित आहे.आॅटोचालकांना नियम नाहीत का?आॅटोमध्ये विद्यार्थी प्रवासासाठी परवानगी दिली जात नाही. आॅटोला ३-१ चे पासिंग असले तरी पाच लहान मुलांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे. आॅटोचालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून नेतात. हा प्रकार नियमबाह्य आहे. त्यामुळे थोडेअधिक पैसे कमाविण्यासाठी आॅटोचालक असले धाडस करतात. त्यामुळे त्यांना नियमावली नाही का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.