शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

टंचाईची तीव्रता वाढली; तीन गावांना चार टँकरने पाणीपुरवठा

By जितेंद्र दखने | Updated: April 17, 2024 18:34 IST

यंदा २१ कोटी १८ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जवळपास ७६७ गावे टंचाईच्या छायेत आहेत, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत.

अमरावती : एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्रतेकडे वाटचाल करीत आहेत. चिखलदरा तालुक्यातील तीन गावांना चार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू केला जात आहे. याशिवाय अनेक गावांता खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागविण्याचे काम प्रशासनाला करावे लागत आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही गावांना टँकर लागण्याची शक्यता आहे.सध्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील चुर्णी, कोरडा आणि चुनखडी या तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

विशेष म्हणजे मागील आठवड्यात केवळ एकाच गावाला टँकर होता. सहा किलोमीटर अंतरावरील एका गावात खासगी विहिरीचे अधिग्रहण करून तेथून टँकरद्वारे पाणी आणून ते तहानलेल्या गावांना दिले जात आहे. यंदा २१ कोटी १८ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जवळपास ७६७ गावे टंचाईच्या छायेत आहेत, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत. ३० गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी अपेक्षेपेक्षा फारच कमी पावसाळा झाल्याने यंदा टंचाईची तीव्रता वाढणार हे गृहीत धरून कृती आराखड्यामध्ये ३० गावांना टँकरद्वाो पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. काही गावांमध्ये फेब्रुवारीपासूनच टंचाई जाणवत आहे.

या गावांना लागणार टँकरचिखलदरा तालुक्यातील बगदरी, बेला, खिरपाणी, भीलखेडा, माखला, गवळीढोणा, भवई, खोगडा, रायपूर, आकी, मोथा, खडीमल, गौलखेडा बाजार, सोनापूर, मांजरकापडी, पाचडोंगरी, कोरडा, कारदा, बहाद्दरपूर, सोमवारखेडा, धरमडोह, एकझिरा, तर चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, तिवसा तालुक्यातील काटसूर, इसापूर, तारखेडा, फत्तेपर या गावांना पुढील काही दिवसांत टँकर लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAmravatiअमरावती