शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सव्वादोन कोटींच्या घोटाळ्याचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात !

By admin | Updated: April 20, 2016 00:20 IST

नियम आणि अटी-शर्तींना पायदळी तुडवून शासकीय निधीच्या गैरवापराचा ठपका असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

डझनवारी अधिकाऱ्यांचा समावेश : कारवाईकडे लक्षअमरावती : नियम आणि अटी-शर्तींना पायदळी तुडवून शासकीय निधीच्या गैरवापराचा ठपका असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतील २.३० कोटी रुपयांच्या अनियमिततेचा चेंडू तूर्तास आयुक्तांच्या कोर्टात आहे. योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वारेमाप खर्च केला. अतिरिक्त रक्कम कंत्राटदारांच्या खिशात घातली. त्यामुळे योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. लेखापरीक्षण अहवालात या गंभीर अनियमिततेवर बोट ठेवण्यात आले. राज्यातील नागरी भागांमध्ये राहणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १९९७ पासून केंद्र पुरस्कृत सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरू करण्यात आली. भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवरअमरावती : महापालिका क्षेत्रात १ एप्रिल २००९ ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत या योजनेतून उद्यानविकासासह डेक्स-बेंच खरेदी व मुंबईच्या अभ्यास सहलीसह अन्य कामे करण्यात आलीत. मात्र, मुख्यत्वे या तीन योजना राबविताना मोठे आर्थिक गौडबंगाल झाल्याची कुणकुण महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना लागली. त्यांनी संबंधित प्रकल्प प्रमुखांकडून पदभार काढून महत्त्वपूर्ण तीन बाबींचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. या लेखापरीक्षणामध्ये लेखापरीक्षकांनी सुमारे २.३० कोटींहून अधिक रकमेच्या प्रदानावर आक्षेप नोंदविले आणि जबाबदारी निश्चित करुन कारवाईदेखील प्रस्तावित केली. अमरावती महापालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या या प्रकरणाने भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रूजली आहेत, याची प्रचिती येते. ‘लोकमत’ ने फोडली वाचा सुवर्ण जयंती रोजगार योजनेतील भ्रष्टाचाराला ‘लोकमत’ने वाचा फोडली. याबाबत वृत्तमालिका ‘प्रकाशित करुन याप्रकरणातील गंभीर अनियमितता जनतेसमोर आणली गेली. चेंडू आयुक्तांच्या कोर्टात आहे. शासकीय निधीचा गैरवापर करून जनतेच्या पैशाची वाट लावणाऱ्या संबंधितांविरुद्ध ते कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.