शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सतीश मडावीला वीरमरण; समाजमन गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:31 IST

अवैध धंदेवाईकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सतीश मडावीच्या आकस्मिक मृत्यूने त्याचे कुटुंबीयच नव्हे, समाजमन सुन्न झाले. कारवाईवेळी पोलिसांवर हल्ला होऊन हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे.

ठळक मुद्देआकस्मिक हल्ला : कुटुंब पोरके, असामाजिक तत्त्वांनी केला निर्घृण खून, अमरावतीत अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : अवैध धंदेवाईकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सतीश मडावीच्या आकस्मिक मृत्यूने त्याचे कुटुंबीयच नव्हे, समाजमन सुन्न झाले. कारवाईवेळी पोलिसांवर हल्ला होऊन हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. केवळ वेतन घेण्यासाठी नोकरी नसून आपल्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली, तिचे वहन करताना सामाजिक बांधिलकी जोपासणारा पोलीस कर्मचारी म्हणून मडावी पोलीस दलात ओळखले जायचे. चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सतीश मडावी यांना अवैध धंद्यावर धाड टाकताना जे वीरमरण आले, त्या घटनेवरून अवैध व्यवसायांवर धाड टाकताना मोठा ताफा घेऊन जाण्याची खबरदारी पोलीस यंत्रणेला घ्यावी लागणार असल्याची प्रतिक्रिया उमटली. ठाणेदार ब्रम्हानंद शेळके यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मडावी यांच्या आकस्मिक जाण्याने मोठा मानसिक धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच सतीश मडावीची पत्नी, आई, ११ वर्षांची मुलगी, ६ वर्षांचा मुलगा चांदूररेल्वेत दाखल झाले. ग्रामीण रूग्णालयात पतीचे पार्थिव पाहताना त्यांच्या पत्नीचा आक्रोश मन हेलावणारा होता. मडावी मूळचे यवतमाळ जिल्ह्यातले होते. ते अमरावती शहरात कार्यरत असताना त्यांनी पोटे टाऊनशिपमध्ये घर विकत घेतले. मुलांचे शिक्षण दर्जेदार शाळेतून व्हावे, यासाठीच ते अमरावतीला स्थायिक झाले होते. सतीश मडावी यांची जी हत्या झाली ती अतिशय क्रूरतेनेच. गरम पाणी फेकणे, पायावर मारणे, खाली पडताच त्यांच्या डोक्यावर मोठा दगड घालण्यात आला. सकाळी ८.४५ वाजता सतीश मडावी यांनी मांजरखेड येथील रहिवासी माधव कावलकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत हल्ल्याची माहिती दिली. कावलकर पोलीस पाटील प्रफुल्ल गुल्हाने यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले असता मडावी मृतावस्थेत आढळले.चूक की दुर्लक्ष?गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी दोन्ही पोलीस नि:शस्त्र गेले होते. त्यामुळे ते आरोपींचा कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करू शकले नाहीत. ही चूक की दुर्लक्ष, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आरोपींनी हल्ला केल्यानंतर दोन्ही पोलिसांच्या अंगावर उकळते पाणी फेकल्याचे आढळून आले आहे. हल्ल्याची स्थिती निर्माण होईल, याविषयी पोलिसांनी सतर्कता बाळगली नाही, त्याबाबत चांदुररेल्वेत चर्चा सुरु होती.