शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवेचा ध्यास.. चालक न मिळाल्याने सरपंच स्वतः कचरा गाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 14:25 IST

३२ वर्षे सीमेवर देशाची सेवा करून निवृत्त झाल्यावर ग्रामसेवेचा ध्यास घेतलेले सरपंच सुधाकर मानकर गेल्या दोन दिवसांपासून स्वतः कचरा गाडी फिरवून गावातील कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत.

प्रशांत काळबेंडे

अमरावती : जरूड गावातील कचरा गोळा करणाऱ्या वाहनासाठी चालक मिळत नसल्याने आपले गाव स्वच्छ राहावे या हेतूने माजी सैनिक असलेले सरपंच सुधाकर मानकर हे स्वतः या वाहनावर चालक बनून दोन दिवसांपासून गावातील गल्लीबोळात फिरून कचरा गोळा करीत आहेत. या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून लौकिकप्राप्त जरूड गावाचे सरपंचपद गेल्या दोन वर्षांपासून माजी सैनिक सुधाकर मानकर भूषवित आहेत. आपल्या सरपंचपदाच्या पहिल्या दिवसापासून ‘गावाचा विकास, तर देशाचा विकास’ या भावनेने प्रेरित आलेल्या सुधाकर मानकर यांनी कार्यास सुरुवात केली. व आज ऑक्सिजन पार्क, रोपवाटिका, दिवाळीच्या दिवशी पूर्वजांची आठवण म्हणून स्मशानभूमीत दिव्यांची आरास, कोरोनाकाळात प्रत्येक रुग्णाच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने चौकशी, गावाच्या साफसफाईसाठी आणि विकासासाठी कचरा पेटीचे घरोघरी जाऊन वाटप करताना टॅक्स जमा विनंती करताना अत्यंत गरीब व्यक्तीचा टॅक्स आणि त्याला मदत स्वतःच्या खिशातून करणे आदी कारणांनी ते तालुक्यातील प्रत्येकाच्या कौतुकास पात्र व्यक्ती ठरले आहेत. ३२ वर्षे सीमेवर देशाची सेवा करून निवृत्त झाल्यावर ग्रामसेवेचा ध्यास घेतलेले सरपंच सुधाकर मानकर गेल्या दोन दिवसांपासून स्वतः कचरा गाडी फिरवून गावातील कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत.

सरपंच झाल्यापासून गावातील प्रत्येक नागरिकाचे स्वास्थ निरोगी राहावे, उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याची जबाबदारी माझी आहे. कचरा गाडीवर चालक नसल्याने मी स्वतः कचरा गाडी घेऊन फिरतो, यात कमीपणा नाही. कोणतेही काम छोटे वा मोठे नाही. गावची सेवा करताना एक सैनिक म्हणून देशसेवाच करीत असतो.

- सुधाकर मानकर, सरपंच, जरूड

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिकsarpanchसरपंच