परतवाडा :
समाजाचा कणा असलेल्या पोलिसांच्या कार्याची प्रचिती सर्व स्तरावर येते, नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध कार्यात अग्रस्थानी पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण असते अशातच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस स्टेशन आवारात २५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले
सरमसपुरा पो स्टे चे परिसरात ठाणेदार जमील शेख यांचे मार्गदर्शनात २५० विविध प्रकारचे वृक्ष रोपांचे वृक्षारोपण करण्यासोबत इथेच न थांबता त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. वृक्षारोपण करिता ठाणेदार जमील शेख , सपोनी निलिमा सातव, एएसआय राजकुमार सोनार, पोहेका प्रकाश काळे,संजय इंगळे, झाकीर खान,निर्मला जावरे,उषा पेरे , पो ना सूरज तांडीलकर, पोका सिद्धांत ढोले,पंकज ठाकरे,प्रवीण बाखडे,पवन पवार, प्रिती हटवार व इतर कर्मचार्यांनी हा संकल्प केला
200721\img-20210719-wa0031.jpg
सरमसपुरा पोलिसांनी लावले वृक्ष ,