शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

पळसाखाली झाकला वाळू साठा

By admin | Updated: June 27, 2016 00:08 IST

जंगलात वाळूचा साठा करून ती वाळू लपविण्याच्या उद्देशाने पळसाची पाने टाकून झाकून ठेवण्यात आली.

वाळू माफियांचा प्रताप : तीन लाखांची वाळू जप्तअमरावती : जंगलात वाळूचा साठा करून ती वाळू लपविण्याच्या उद्देशाने पळसाची पाने टाकून झाकून ठेवण्यात आली. वाळूमाफियाचा हा प्रताप रविवारी उघडकीस आला. हा वाळू साठा मंडळ अधिकाऱ्यांनी जप्त केला असून पुढील कायदेशीर कारवाई महसूल विभाग करीत आहेत. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची तस्करी सुरु असल्याचा भांडाफोड झाला. महसूल विभागाने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसुध्दा केली. मात्र, आणखी अनेक वाळू साठे असल्याचे निदर्शनास आले होते. त्याकरिता पोलीस अधीक्षक लखमी गौतम पोलिसांचे एक स्वतंत्र पथक तयार करून कारवाईची आदेश दिलेत. त्यानुसार वाळू माफियानी साठविलेल्या वाळुची शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली. धारणी ठाण्याच्या हद्दीतील भोकरबर्डी येथील शिवारात महाराष्ट्र- मध्यप्रदेश सिमेवर तापी नदी आहे. या नदीच्या काठावर तसेच आजूबाजूच्या जंगलामध्ये अवैधरीत्या वाळूचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नागेश चतरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण मेटे, पोलीस शिपाई सचीन मीश्रा, गजेंद्र ठाकरे, शैलेश तिवारी व चालक काळे यांनी वाळु साठ्याचा शोध घेतला. त्यामध्ये नदीपासून काही अंतरावर असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस व जंगलात अशा तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू लपून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हा वाळू साठा कोणाला दिसू नये, याकरिता वाळू माफियांनी तो साठा पळसाच्या पानांखाली झाकून ठेवल्याचे लक्षात आले. या वाळू साठ्याची शहानिशा करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत घटनास्थळी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पाचारण केले. त्यांनी वाळूची पाहणी केली असता ती वाळू अवैध असून वाळू अंदाजे ९४ ब्रॉस व २ ते ३ लाख किमतीची असल्याचे निदर्शनास आले. ती वाळू मंडळ अधिकाऱ्यांनी जप्त केली. (प्रतिनिधी)