शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
3
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
4
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
5
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
6
Eknath Shinde: ‘बाळासाहेब हे एकच ब्रँड; स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा बँड वाजवणार' एकनाथ शिंदेंचा टोला
7
रणवीर सिंहचा 'धुरंधर' सिनेमा दोन भागात येणार? तगड्या क्लायमॅक्ससह मेकर्सचा नवीन प्लॅन
8
आंध्र प्रदेशातील आमदाराला केलं ३ दिवस 'डिजिटल अरेस्ट', १.०७ कोटींचा गंडा, ८ जणांना अटक
9
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
10
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
11
CNG Crisis: ‘सीएनजी’ची बोंब, हजारो वाहने रस्त्यावरून गायब, प्रवाशांचे प्रचंड हाल!
12
मदीना बस अपघातात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू; नातेवाईक म्हणाले- अल्लाहने त्यांच्या नशिबात...
13
सौदीचे प्रिन्स दौऱ्यावर येण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; दिलं मोठं 'गिफ्ट'
14
Navi Mumbai: महाराजांचा अपमान सहन करणार नाही, दडपशाही जुमानणार नाही; अमित, आदित्य यांचा सरकारला इशारा
15
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
16
IND vs SA : ...तर करुण नायरसह तिघांपैकी एकाला मिळू शकते टीम इंडियात ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’
17
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
18
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
20
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:37 IST

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यात काही रेतीघाटांवरून वाळूचा उपसा बंद असला तरी मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवली जात आहे. त्याचवेळी बंदचा बाऊ करीत व्यावसायिकांकडून ती चढ्या दराने विकली जात आहे. याचा बांधकामावर परिणाम होत आहे, शिवाय अवैधरीत्या आणली जाणारी वाळू महसूल विभागाला दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देबांधकामांवर परिणाम : अवैध साठ्यांना महसूल विभागाचा ‘आशीर्वाद’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यात काही रेतीघाटांवरून वाळूचा उपसा बंद असला तरी मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवली जात आहे. त्याचवेळी बंदचा बाऊ करीत व्यावसायिकांकडून ती चढ्या दराने विकली जात आहे. याचा बांधकामावर परिणाम होत आहे, शिवाय अवैधरीत्या आणली जाणारी वाळू महसूल विभागाला दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वाळू तस्करीत तलाठी, नायब तहसीलदार ते तहसीलदार अशी साखळी असल्यामुळेच उपसा बंद असूनही शहरातील गल्ली-बोळात वाळूचे अवैध साठे आढळतात. घरे, सदनिका, सरकारी रस्ते, शॉपींग कॉम्प्लेक्स, क्रीडांगण आदी बांधकामे ही उन्हाळ्यात केली जातात. मात्र, वाळू अव्वाच्या सव्वा दराने विकली जात असल्याने याचा आर्थिक फटका घरमालकांना सहन करावा लागत आहे. दुसरीकडे वाळूअभावी अर्धवट कामे बंद ठेवण्याचा प्रसंग बांधकाम व्यावसायिकांवर आला आहे. चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागत असल्याने बिल्डर्स, बांधकाम व्यावसायीकांचे नियोजन कोलमडले आहे. शहरात तस्कर मात्र विनारॉयल्टी वाळू विक्रीसाठी आणत असून, याचा फटका महसूल विभागाला बसत आहे. रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुलांची बांधकामे सुरू असून, त्यासाठी जादा दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. दोन ब्रास वाळूसाठी १६ ते १८ हजार रुपये मोजावे लागत असल्याने मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांचा घर बांधणीचा वेग मंदावला आहे. वाळूअभावी बांधकामे मंदावल्यामुळे कुशल-अर्धकुशल कामगारांची काम शोधण्यासाठी भटकंती होत आहे. अमरावती व बडनेरा शहरात जागोजागी नियमबाह्य वाळूचे साठे असताना तहसीलदारांना ते का दिसत नाही, हा संशोधनाचा विषय आहे.सरकारी कामात वाळूऐवजी चुरीचा वापरहल्ली महानगरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते निर्मितीची कामे सुरू आहे. परंतु, अधिकृत वाळू उपसा बंद असल्याने या बांधकामात वाळूऐवजी चुरी (डस्ट) चा वापर केला जात आहे. सिमेंट रस्ते निर्मितीत वाळूचा वापर न होणे म्हणजे या रस्त्याच्या दर्जाशी तडजोड करणे होय, असे तज्ञ्जांचे मत आहे. बांधकामात वाळूचा वापर अतिशय महत्त्वाचा असून, डस्टमुळे रस्त्याचा दर्जा राखला जात नाही, हे वास्तव आहे.नव्या नियमानुसार चार रेतीघाटांचा लिलाव चढ्या दराने करण्यात आला आहे. त्यामुळे वाळूचे दर नक्कीच वधारले असतील. काही वाळूघाटांचा लिलाव अद्यापही बाकी आहे. वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.- अभिजित बांगरजिल्हाधिकारी, अमरावती.चढ्या दरात वाळू खरेदी करून बांधकामे पूर्ण करावे लागत आहे. प्रतिट्रक सहा ते आठ हजार रुपये जादा द्यावे लागत असल्याने नियोजन कोलमडले आहे.- प्रकाश दातारबांधकाम ठेकेदार, बडनेरा.