शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वरूडच्या नायब तहसीलदारांसह चार तलाठ्यांवर रेतीमाफियाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 23:36 IST

डंपरचालकांनी पथकाला कागदपत्रे दाखविली नाही. याचवेळी मागून कारने आलेल्या दोघांनी पथकातील पाच जणांवर बेसबॉल स्टिकने हल्ला चढविला, तर एका तलाठ्याचा मोबाइल हिसकावून नेला. तक्रार दाखल झाल्यानंतर शेंदूरजनाघाट पोलिसांनी डंपर जप्त करून आठ वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांना रेती तस्करांकडून हल्ल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : अवैध रेती वाहतुकीवर अंकुश ठेवण्याकरिता महसूल प्रशासनाने पथक नेमले. नायब तहसीलदार आणि चार तलाठ्यांचे हे पथक गुरुवारी पहाटे दाेन वाजता पुसला बसस्टँडवर असताना वरूडकडे दोन रेतीचे डंपर येत होते. डंपरचालकांनी पथकाला कागदपत्रे दाखविली नाही. याचवेळी मागून कारने आलेल्या दोघांनी पथकातील पाच जणांवर बेसबॉल स्टिकने हल्ला चढविला, तर एका तलाठ्याचा मोबाइल हिसकावून नेला. तक्रार दाखल झाल्यानंतर शेंदूरजनाघाट पोलिसांनी डंपर जप्त करून आठ वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांना रेती तस्करांकडून हल्ल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. पोलिस सूत्रांनुसार, कृणाल राजस, हर्षल ऊर्फ गोलू इंगोले (दोघेही रा. जरूड) यांच्यासह दोन टिप्परमधील चालकांसह अधिक चार लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तालुक्यातून अवैध रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे पाहून तहसीलदारांनी नायब तहसीलदार पंकज चव्हाण, तलाठी विनोद पवार, महेंद्र चव्हाण, केवलसिंह गोलवाल, रवींद्र परतेती यांच्या पथकाची १५ नोव्हेंबरला रेती तस्करीला आळा घालण्याकरिता नियुक्ती केली. पथक १७ नोव्हेंबरच्या पहाटे दोनच्या सुमारास वरूड ते पांढुर्णा मार्गावर अवैध रेती वाहतूक तपासणीकरिता पुसला बसस्टँडवर उभे होते. वाळू घेऊन येणारे दोन डंपर त्यांनी थांबविले. तथापि, चालकांनी आवश्यक कागदपत्रे दाखविण्यास नकार दिला. यादरम्यान कारमधून कुणाल राजस आणि हर्षल उर्फ गोलु इंगोले उतरले आणि डम्पर थांबविल्याबाबत पथकाला शिवीगाळ केली. व्हिडीओ शूटिंग करीत असलेले चव्हाण यांचा मोबाइल हिसकावला. यानंतर बेसबॉल स्टिकने सर्वांना मारहाण केली. यानंतर त्यांनी कारसह पोबारा केला. शेंदूरजनाघाटचे ठाणेदार सतीश इंगळे यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळावर जाऊन दोन डंपर ताब्यात घेतले. नायब तहसीलदार पंकज चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहेत. 

एकाच महिन्यातील दुसरी घटनारेती तस्करी करणाऱ्या वाहनाला ८ नोव्हेंबरला बेनोडा येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक यांनी थांबविले असता, धक्काबुक्की केली होती. तेव्हासुद्धा गुन्हे दाखल केले. आता महसुली अधिकाऱ्यांवर हल्ला केला. यापूर्वी तहसीलदारांच्या बंगल्याला बाहेरून कुलूप ठोकण्याचा प्रकार घडल्याने गुन्हे दाखल झाले. मात्र, ठोस कारवाई झाली नाही. यामुळे रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे.

 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया