तयारीची लगबग : फायबरपासून बनविलेले मुखवटे सोयीचेलोकमत दिन विशेषचांदूरबाजार : भाद्रपद शुध्द सप्तमीला महालक्ष्मीचे आगमन होते. भाद्रपद शुक्लपक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर त्यांचे पूजन होते. म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी असे सुध्दा म्हटले जाते. गणेशोत्सव काळात येणारा हा सण गौरी-गणपती म्हणून ही ओळखला जातो. गौरी आवाहन होणार असल्याने त्यांच्या तयारीची लगबग सुरू आहे. गौरीचे मुखवटे, दागिने व इतर सजावटीच्या साहित्यांनी बाजार सजला आहे. प्रत्येकाकडे परंपरेनुसार वेगवेगळ्या पध्दती असतात. काहींकडे उभ्या, बसलेल्या, तांब्याचे मुखवटे असणाऱ्या अशा पध्दती आहेत. पूर्वी महालक्ष्मी बसवणे हा फार किचकट प्रकार म्हटला जायचा. मात्र आता त्या सुधारणा होवून कमी वेळ लागणारे व आकर्षक महालक्ष्मी मूर्ती तथा मुखवटे बाजारात आले आहेत. गौरीच्या मूर्ती फायबरपासून बनविलेल्या असून त्या फॅरनिबल आहेत. त्यांची घडी करता येत असल्याने ठेवण्यास सुलभ आहेत. तसेच दीर्घकाळ टिकून राहतात. कापडाचे हात यासाठी कापसाचे हात हा चांगला पर्याय पुढे आला आहे. तसेच विविध मुखवटेसुध्दा बाजारात उपलब्ध झालेले आहेत. तयार मुखवटेतयार मुखवटे घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात साठी लोखंडी मुखरे व त्यावर कापडी सजावट केलेली मखर असे दोन प्रकार आहेत. या मखर घडी करता येण्याजोगे असल्याने हाताळण्यास सुलभ आहेत.बाजारपेठेत गर्दी वाढलीगौरी-गणपतीचा सण जवळ येऊन ठेपला आहे. जसजसा उत्सव जवळ आला तसतशी बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. त्यानुषंगाने बाजारपेठही सज्ज झालेल्या आहेत. तयार साडीकडे कलगौरींना साडी नेसविण्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र आता शिवून मिळणाऱ्या तयार (रेडिमेड) साडी, नउवारी घेण्याकडे काही महिलांचा कल वाढत आहेत. लाल, गुलाबी, हिरवा, जांभळा असा गर्द रंगातील साड्या व नउवारीला पसंती दिली जात आहे.दागिन्यांची रेंज मोठीगौरीसाठी नानाविध दागिन्यांची मोठी रेंज आली आहेत. यात मोत्यांचे, डायमंड, गोल्डन, सिलव्हर असे दागिने बाजारात आलेले आहेत. हार कानातले, बिंदी, बांगड्या, बाजुबंद, कमरपट्टा, हल्ला, लक्ष्मीहार, मंगळसूत्र, एकदानी, राणीहार, कुंदनहार, तोरड्या, बिच्छवे असे अनेक दागिने आहेत. विविध आकारातील व डिझाईन मुकूट देखील उपलब्ध आहेत. शिवाय कलात्मक केसांचा विग व इतर साहित्यही आहेत.
सण गौराईचा, महालक्ष्मीचे आगमन आज
By admin | Updated: September 19, 2015 00:20 IST