शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

साहिर आधी कोरोनात, आता युद्धामुळे परतला घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक प्रसन्नजित तेलंग यांचा मुलगा साहिर हा युक्रेनचे प्रशासकीय केंद्र असलेल्या चेरनिव्त्सी शहरातील महाविद्यलयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. दोन महिन्यात नॅशनल  एक्झाम देऊन त्या पदवी मिळणार होती. युद्धामुळे सुरळीत सुरू असलेला शैक्षणिक प्रवास थांबला आहे. कोरोनामुळे आधी त्यात खंड पडला होता. आता युद्धानंतर परिस्थिती किती दिवसांनी सावरते, याच्या प्रतीक्षेशिवाय गत्यंतर नाही, असे तो म्हणाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युद्धजन्य स्थितीतून बाहेर कधी पडणार, हा एकमेव विचार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सतावत आहे. रशियाच्या फायटर विमानांमधून सातत्याने बॉम्बवर्षाव होत आहे. त्यामुळे जिवाची भीती आणि कुटुंबाला पारखे झालेल्या या विद्यार्थ्यांची  पहिली तुकडी शनिवारी रात्री विमानाने भारतात पोहोचली आणि सर्वांना रडूच कोसळले. यावेळी सुटकेचा नि:श्वास चांदूर रेल्वे येथील सारंग तेलंगनेही सोडला. तो या विमानाने भारतात परतणारा पहिला अमरावतीकर ठरला. चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक प्रसन्नजित तेलंग यांचा मुलगा साहिर हा युक्रेनचे प्रशासकीय केंद्र असलेल्या चेरनिव्त्सी शहरातील महाविद्यलयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. दोन महिन्यात नॅशनल  एक्झाम देऊन त्या पदवी मिळणार होती. युद्धामुळे सुरळीत सुरू असलेला शैक्षणिक प्रवास थांबला आहे. कोरोनामुळे आधी त्यात खंड पडला होता. आता युद्धानंतर परिस्थिती किती दिवसांनी सावरते, याच्या प्रतीक्षेशिवाय गत्यंतर नाही, असे तो म्हणाला. त्याचे मन अजूनही कॉलेज कॅम्पसमध्येच गुंतल्याचे चेहऱ्यावर झळकत होते. 

मुलापुढे सर्व गौण युद्धग्रस्त स्थितीतून मुलगा पहिल्याच फ्लाईटने घरी सुखरूप पोहोचल्याचा आनंद प्रसन्नजित तेलंग यांच्या चेहऱ्यावर होता. इतर पालकांनाही त्यांची मुले सुखरूप मिळोत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

बसने नेले रोमानियाला चेरनिव्त्सी हे मोठे शहर आहे. येथे हजारो विद्यार्थी, त्यात भारतीय प्रवेशित आहेत. बंकरमध्ये शरण घेतलेल्या या युवकांना बसने रोमानियाच्या सीमेवर व तेथून चेक इन करून राजधानी बुखारेस्ट येथील विमानतळावर नेण्यात आले. तेथे एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. तेथून घरी आल्याचे साहिरने सांगितले. 

दररोज बॉम्बिंगयुक्रेनची राजधानी किव्हवर दररोज बॉम्बिंग केले जात आहे. त्यामुळे या देशात शिकण्यासाठी गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासमवेत त्यांचे पालकदेखील चिंताग्रस्त आहेत. एकमेकांशी परिचय, संपर्क असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक विचारपूस करतात. 

अमरावतीच्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्र्यांचा संवादरशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीयांसोबतच तिथे अडकलेल्या  साहिरसह जिल्ह्यातील अभिषेक बारबडे, प्रणव फुसे, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ  गजभिये, स्वराज पौंड आणि प्रणव भारसाकळे या आठ विद्यार्थ्यांचा संपर्क क्रमांक मिळताच महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तातडीने त्यांच्याशी संवाद साधला व दिलासा दिला. तिवसा तालुक्यातील तुषारसह सर्वांना धीर देत केंद्राच्यावतीने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे, असे पालकमंत्री म्हणाल्या.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीwarयुद्ध