शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुण्याकडील आरटीओ अधिकाऱ्यांचा विदर्भात रूजू होण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 22:36 IST

अमरावती, नागपूर विभागात सारखीच स्थिती; बदली नियमबाह्य झाल्याप्रकरणी ‘मॅट’मध्ये निकाल प्रलंबित

अमरावती : राज्याच्या परिवहन खात्याने प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक अशा विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, यापैकी बहुतांश अधिकारी विदर्भात रुज़ू झाले नाहीत, तर काहींनी महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)मध्ये न्यायासाठी धाव घेतली आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर विभागातून आरटीओ अधिकाऱ्यांची विदर्भात कर्तव्य बजावण्यात नकारघंटा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल वाढीवर मोठा परिणाम होत आहे.परिवहन खात्याने मे २०२५ मध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक यांचा प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. असे असताना विदर्भातील नागपूर व अमरावती विभागांत आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. नागपूर वगळता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत आरटीओत सहायक मोटार वाहन निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षकांची ३५ टक्के समप्रमाणात पदे रिक्त आहेत. अमरावती विभागात हीच स्थिती आहे. एक अधिकारी दोन ते तीन ठिकाणचा कारभार हाताळत आहे. विदर्भात आर्थिक मागासलेपण आणि उद्याेगधंद्यांचा अभाव हे देखील आरटीओ अधिकारी येथे येण्यास नकार देत असल्याचे वास्तव आहे.सहायक वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीची फाईल कुठे?परिवहन खात्याचा कारभार कासवगतीने सुरू आहे. राज्यभरात आरटीओत अधिकारी-कर्मचाऱ्यांची वानवा असताना गत काही महिन्यांपासून ३३० सहायक वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीची फाईल प्रलंबित आहे. सहायक वाहन निरीक्षक हे पदोन्नतीने मोटार वाहन निरीक्षक होतील. मात्र, मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयात ही फाईल कोणी थांबवली? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे राज्याच्या परिवहन खात्यात नेमके काय सुरू आहे, हे अधिकाऱ्यांना सुद्धा कळू शकत नाही. पदोन्नती रखडल्याने काही पदांवर नियुक्तीची प्रतीक्षा आहे.अमरावती विभागात ३७ अधिकाऱ्यांची पदे रिक्तअमरावती विभागात आरटीओत तब्बल ३७ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यात अमरावती १०, बुलढाणा ५, अकोला १०, वाशिम ५ तर यवतमाळ येथे ७ अशी अधिकाऱ्यांची गरज आहे. यवतमाळचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख हे अमरावतीचा कारभार सांभाळत आहेत. चार दिवस यवतमाळ तर दोन दिवस अमरावती अशी त्यांची कसरत होत आहे. तर अमरावती येथे एका मोटार वाहन निरीक्षकाकडे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचा प्रभार सोपवला आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस