शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

रोहयो मजुरांना कोरडा दिलासा !

By admin | Updated: April 18, 2015 01:05 IST

यावर्षी पडलेल्या कोरड्या दुष्काळामुळे ग्रामीण नागरिकांची रोजगारासाठी धडपड सुरू आहे.

मंगेश भांडेकर चंद्रपूरयावर्षी पडलेल्या कोरड्या दुष्काळामुळे ग्रामीण नागरिकांची रोजगारासाठी धडपड सुरू आहे. अशातच रोजगार हमी योजनेची कामे प्रत्येक ग्राम पंचायतस्तरावर सुरू करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यावर्षी दुष्काळ पडूनही रोहयोच्या मजुरीत शासनाने नाममात्र १३ रूपयांची वाढ केली. या वाढीव दरानुसार नव्या आर्थिक वर्षात मजूरी मिळणार असून शासनाने आमची थट्टा केल्याचा आरोप मजुरांकडून होत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनेक कामे करण्यात येत आहेत. या कामांवर शेकडो मजूर काम करीत आहेत. मात्र मजुरांना दिलासा देण्याऐवजी राज्य शासनाने थट्टाच केली आहे. यापूर्वी रोहयो मजुरांना १६८ रूपये मजुरी दिली जायची. १ एप्रिलपासून १३ रूपये वाढ म्हणजे १८१ रूपये मजुरी मिळणार आहे. केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने १३ रूपयाने ही वाढ केली असून, ही वाढ मजुरांची खिल्ली उडविणारी आहे.चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सद्य:स्थितीत जलयुक्त शिवार यासह ग्रामीण पातळीवरील जलसिंचनाच्या विविध योजनांची कामे केली जात आहेत. यामध्ये विहिरी, फलोत्पादन, राजीव गांधी भवन, रोपवाटिका, रस्त्यांची कामे अशा विविध योजनांची कामे दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण बाराशेच्या जवळपास कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यात १६ हजार मजूर काम करीत आहेत. त्यांना नवीन दराने प्रतिदिन १८१ रूपये मजुरी मिळणार आहे. २०१३-१४ साली १६२ रूपये प्रतिदिन मजुरीचा दर होता. तर २०१४-१५ साठी १६८ रूपये प्रतिदिन मजुरीचा दर करण्यात आला. आणि आता त्यात १३ रूपयांनी वाढ करून २०१५-१६ साठी १८१ रुपये प्रतिदिन मजुरी दिली जाणार आहे. मागील दोन वर्षांत केवळ १३ रूपयांनी मजुरी वाढल्याने केंद्र शासनाने रोहयो मजुरांची खिल्ली उडविली असल्याची चर्चा मजूरवर्गात व्यक्त होत आहे. महागाईच्या परिस्थितीत खाजगी कामांमध्ये प्रतिदिन महिलांना २०० ते ३०० रूपये तर पुरुषांना ३०० ते ४०० रूपये मिळत आहेत. तर शासनाने प्रतिदिन केवळ १८१ रूपये मजुरी देऊन या मजुरांची उपेक्षा केली आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये मजुरांना भरगच्च वाढ देण्याऐवजी शासनाने मजुरीमध्ये केवळ १३ रूपयांची वाढ केल्याने मजुर वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.