प्रदीप भाकरे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सन २०२२ ते फेब्रुवारी २०२५ या तीन वर्षे दोन महिन्यांच्या कालावधीत शहर आयुक्तालयात जबरी चोरी, दरोडा, वाहनचोरी, घरफोडी व इतर चोरींच्या एकूण ५८८९ गुन्ह्यांत तब्बल २६.६९ कोटींच्या मुद्देमालावर चोरांनी डल्ला मारला. पैकी १४३२ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. जानेवारी २०२२ ते यंदाच्या फेब्रुवारीपर्यंत तब्बल ११३० आरोपींना अटक करण्यात आली, तर त्यांच्याकडून एकूण ६.२७ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यातील बहुतांश मुद्देमाल फिर्यादींना न्यायालयीन आदेशानुसार परतदेखील करण्यात आला.
जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२५ यादरम्यान इतर चोरीमधील ३.६३ कोटी, घरफोडीमधून ७४ लाख, जबरी चोरीमधील २४.१० लाख, वाहन चोरी मधील १.३६ कोटी व दरोड्यातील २८.६७ लाख रुपये असा६.२७ कोटी रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. २४ टक्के माल रिकव्हरी. ते प्रमाण सरासरी २३.५१ टक्के असे राहिले. पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या कार्यकाळात ते उच्चांकी राहिले.
६० वाहने मिळालीतविशेष म्हणजे, या दोन महिन्यांत जुने व नव्या घटनांमधील वाहनचोरीच्या ६० गुन्ह्यांचा उलगडा झाला. गेल्या दोन महिन्यांत वाहनचोरीचे ६५, दरोड्याचा १, घरफोडीचे ५१, जबरी चोरीचे २१, मंदिरातील चोरीचे २ व इतर चोरींबाबत १५१ असे एकूण २९१ गुन्हे नोंदविले गेले. त्यात वाहनचोरी ऑन टॉप राहिली आहे. ६५ पैकी ५ गुन्हे उघड झालेत.
शीर्षक गेला माल मिळाला माल अटक आरोपीजबरी चोरी ९७,४२,०६४ २४,१०,४२९ २०९दरोडा ५९,४९,१८६ २८,६७,४१० ७५वाहन चोरी ४,५४,३६,६९८ १,३६,६४,८५३ १८२अन्य चोरी १४,२९,५०,२८२ ३,६३,७०,४३० ४०७घरफोडी ६,२४,२७,९४४ ७४,४५,७१८ २४४मंदिर चोरी ४,४१,४०० १९,७२० १३एकूण २६,६९,४७,५७४ ६,२७,७८,५६० ११३०
सन २०२२ ते २०२५ या तीन वर्षांतील गुन्हेशीर्षक दाखल उघडवाहन चोरी १३३८ २८१दरोडा २९ २८मंदिर चोरी ४२ ०८जबरी चोरी २४३ १६२घरफोडी ८४७ १८५इतर चोरी ३३९० ७६८