लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पानटपरीचालकास मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. ही घटना सोमवारी रात्री ११ च्या सुमारास फे्रजरपुरा हद्दीतील फॉरेस्ट कॉलनीपुढील मार्गावर घडली. अन्नू ऊर्फ अन्वर रंगारी अब्दुल समद (३०, रा. जुना सराफा), विक्की अविनाश बंड (२५, रा. दहीसाथ) व आशिष ऊर्फ हरी कीर्तीकुमार गोटी (३०, रा. दहिसाथ) अशी आरोपींची नावे आहेत.पोलीस सूत्रानुसार, बुºहान चंदू रायलीवाले (४६, रा. गवळीपुरा) यांचा यशोदानगर चौकात पानटपरीचा व्यवसाय आहे. तो सोमवारी रात्री पानटपरी बंद करून दुचाकीने घरी जात असताना, फॉरेस्ट कॉलनी मार्गावर कारमधून आलेल्या तिघांनी बुºहानला अडवून बेदम मारहाण केली आणि पाच हजारांची रोख जबरीने हिसकावून नेली. घटनेच्या तक्रारीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी तीन अज्ञातांविरुद्ध भादंविच्या कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. दरम्यान, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राम गितेंसह पथकातील सुभाष पाटील, सुलतान बन, विनय मोहोड, शेखर रामटेके, सुनील बाजगिरे व चालक प्रधान यांनी तक्रारकर्त्याने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपींचे शोधकार्य सुरू केले. पोलिसांनी दोन आरोपींना कोतवाली हद्दीतून अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली असून, रोख जप्तीसाठी आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
लुटमार करणारे तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:35 IST
पानटपरीचालकास मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. ही घटना सोमवारी रात्री ११ च्या सुमारास फे्रजरपुरा हद्दीतील फॉरेस्ट कॉलनीपुढील मार्गावर घडली.
लुटमार करणारे तिघे अटकेत
ठळक मुद्देफ्रेजरपुरा हद्दीतील घटना : गुन्हे शाखेची कारवाई, कार जप्त