शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

रस्ता चौपदरीकरणासाठी तोडलेली वृक्षे ठरत आहे जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:25 IST

अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी एक महिन्यापूर्वी तोडण्यात आलेले वृक्ष अजूनपर्यंत तेथेच पडून आहे. रात्री अंधारात हे वृक्ष वाहनचालकांना एकाएकी दिसत नसल्याने धोक्याचे ठरत आहे. तात्काळ हटविण्याची मागणी पुढे आली आहे. संबंधित यंत्रणेने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराला अभय : यंत्रणा केव्हा देणार लक्ष ?

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी एक महिन्यापूर्वी तोडण्यात आलेले वृक्ष अजूनपर्यंत तेथेच पडून आहे. रात्री अंधारात हे वृक्ष वाहनचालकांना एकाएकी दिसत नसल्याने धोक्याचे ठरत आहे. तात्काळ हटविण्याची मागणी पुढे आली आहे. संबंधित यंत्रणेने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.नरखेड रेल्वे उड्डाणपुलापासून ते बडनेरा रेल्वे स्टेशनजवळून गेलेल्या महामार्गावरील उड्डाणपुलापर्यंतचे वृक्ष चौपदरीकरणाच्या कामासाठी तब्बल एक महिन्यापूर्वी तोडण्यात आले. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यालगतच पडून असणाऱ्या वृक्षांमुळे बºयाच वाहनचालकांवर पडण्याची वेळ येत आहे. या मार्गावरून जाणाºया वाहनचालकांमध्ये याप्रती संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. वृक्ष असेच तोडून ठेवायचे होते, तर कटाईची घाई का केली, असेही बोलले जात आहे. हे तोडलेले वृक्ष येथून तात्काळ हटवावे, असे बडनेरा वासियांसह वाहन चालकांमध्ये बोलल्या जात आहे. यंत्रणा सदर कंत्राटदाराला अभय देत असल्याचे स्पष्ट होत आहे.तब्बल तीन किलोमीटरपर्यंतच्या अंतराची वृक्षकटाई करण्यात आली आहे. रस्त्यालगत पडलेले वृक्ष व खराब रस्त्यांमुळे एवढ्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ज्या भागात वृक्षकटाई करण्यात आली, तेथे पुरेशी प्रकाश व्यवस्थादेखील नाही. याचा सारासार विचार प्रशासनाने करावा, अशी मागणी नागरिकांमधूून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्ष कापण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिला, त्याने निर्धारित वेळेत कापलेले लाकूड उचलून नेऊन त्याची विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे. मात्र, महिन्याचा कालावधी लोटूनही रस्त्याच्या दुतर्फा अपघातास कारणीभूत ठरणारे हे भले मोठे ओंडके जागोजागी आहे. याशिवाय या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आता या रस्त्याच्या दुरुस्तीची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.अमरावती मार्गावर तोडण्यात आलेली झाडे रस्त्यालगत तशीच पडून आहे. ती धोक्याची ठरत आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी व तात्काळ रस्त्यालगत पडून असणारी झाडे हटवावीत.- नितीन मांजरेसामाजिक कार्यकर्ते, बडनेरा.