सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:55+5:302021-05-30T04:11:55+5:30

तालुक्यातील वनोजा बाग येथील लखमाजी महाराजांचे मंदिर पुरातन असून, येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, एका शेतकऱ्याने ...

Road closed to Public Works Department | सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड केला बंद

सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड केला बंद

तालुक्यातील वनोजा बाग येथील लखमाजी महाराजांचे मंदिर पुरातन असून, येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, एका शेतकऱ्याने येथील रस्ता बंद केल्यामुळे गावंडगाव, सातेगाव, वडनेर गंगाई, येवदा, उमरी, वनोजा, चिंचोली हा वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे.

गावंडगाव येथील एका शेतकऱ्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता खोदून बंद केला. त्यामुळे लखमाजी महाराजचे पदाधिकाऱ्यांनी रहिमापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली. रोड बंद केल्याने सातेगाव, गावंडगाव, वनोजा, चिंचोली बुद्रुकवासीयांचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभाग महसूल विभाग लक्ष द्यावे, अन्यथा वनोजा येथील नागरिक उपोषणाला बसण्याची शक्यता आहे.

Web Title: Road closed to Public Works Department