शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

धोका वाढला, चाचण्यांना गती केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील नमुने सुरुवातीला एम्स, नागपूर येथील विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत स्वॅब पाठविण्यात आले व मागच्या आठवड्यापर्यंत येथे तपासणी करण्यात आली. नागपूर व अन्य जिल्ह्यांत कोरोना संक्रमितांच्या संख्येत वेगाने वाढ व पर्यायाने नमुन्यांची संख्यावाढ झाल्याने एम्सच्या लॅबवर ताण वाढला. त्यामुळे नागपूरसोबतच अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत अमरावती येथील नमुने पाठविण्यास सुरुवात झाली.

ठळक मुद्देविद्यापीठ लॅबमध्येच तपासणी : नागपूर, सेवाग्राम, अकोला येथे नमुने पाठविणे बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेड झोन असणाऱ्या महापालिका क्षेत्रात संक्रमित व्यक्ती त्वरेने निष्पन्न होण्यासाठी त्या व्यक्तीचा, तिच्या निकटतम संपर्कातील व्यक्तींचा थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल लवकर प्राप्त होणे महत्त्वाचे आहे. मात्र, या आठवड्यात अहवालास विलंब व नमुुने रिजेक्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमितांच्या वाढत्या संख्येच्या पार्र्श्वभूमीवर चाचणी अहवालास होणारा विलंब धोकादायक ठरणारा आहे.जिल्ह्यातील नमुने सुरुवातीला एम्स, नागपूर येथील विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत स्वॅब पाठविण्यात आले व मागच्या आठवड्यापर्यंत येथे तपासणी करण्यात आली. नागपूर व अन्य जिल्ह्यांत कोरोना संक्रमितांच्या संख्येत वेगाने वाढ व पर्यायाने नमुन्यांची संख्यावाढ झाल्याने एम्सच्या लॅबवर ताण वाढला. त्यामुळे नागपूरसोबतच अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत अमरावती येथील नमुने पाठविण्यास सुरुवात झाली. यासोबत सेवाग्राम येथील लॅबमध्येही नमुने पाठविलेत. त्यामुळे अमरावतीच्या संशयितांचे अहवाल दिवसभरात दोन-तीन वेळा मिळायला लागले. दरम्यान, अमरावती येथेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (पीडीएमसी)मध्ये विषाणू परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती आली. येत्या आठवड्यात पीडीएमसीची लॅबदेखील सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, त्यापूर्वी विद्यापीठातील लॅबमध्ये परीक्षण सुरू होताच नागपूर, अकोला व वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे नमुने पाठविणे थांबविण्यात आले. जिल्ह्यातील १०० ते १५० नमुन्यांचे दररोज विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत परीक्षण केले जात असल्याने तेथेही ताण वाढतोय. या प्रयोगशाळेत सुरुवातीला दिवसाला २४ व नंतर ४८, आता त्यापेक्षा जास्त नमुन्यांचे परीक्षण केले जात आहे. जिल्ह्यात ज्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे, त्याच्या तुलनेत नमुने कमी घेतले जात आहेत. विद्यापीठ प्रयोगशाळेवरही आता ताण वाढत असल्याने परीक्षणाला विलंब होतो व त्यामुळे संक्रमित निष्पन्न झाल्यानंतरच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे वास्तव आहे.‘ट्रूनॉट’ कार्यान्वित केव्हा?कोरोनाचे संशयित रुग्ण त्वरेने निष्पन्न व्हावेत, त्यांच्यावर लगेच उपचार होऊन अन्य व्यक्ती संक्रमित होऊ नये, किंबहुना कोरोनाची साखळी बे्रक व्हावी, यासाठी जिल्ह्याला एक ट्रूनॉट मशीन उपलब्ध झाली असून, ती पीडीएमसीत लावली आहे. तासाभरात नमुन्याचा अहवाल येतो. पॉझिटिव्ह असल्यासच त्या नमुन्याची आरटी-पीसीआर तपासणी केली जावी व याद्वारे लॅबवर येणारा ताण कमी व्हावा, हा त्यामागील उद्देश होता. मात्र, आठ दिवसांत ही यंत्रणाच कार्यान्वित झालेली नाही.विद्यापीठाकडून प्राप्त अहवालजिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या प्रयोगशाळेला १७ मे रोजी ७५ नमुने पाठविले, ८९ अहवाल प्राप्त झाले. १८ मे रोजी १३८ नमुने पाठविले, ८३ अहवाल प्राप्त झाले. १९ मे रोजी १३९ नमुने पाठविले, १३७ अहवाल प्राप्त झाले. २३ मे रोजी १४६ नमुने पाठविले, ११२ अहवाल प्राप्त झाले. २२ मे रोजी १५१ नमुने पाटविले, ५६ अहवाल प्राप्त झाले. २१ मे रोजी ९२ नमुने पाठविले, ९१ अहवाल प्राप्त झाले. २० मे रोजी ७६ पाठविले, तर १४८ अहवाल प्राप्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या