शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात फाटाफूट, विभाजनचा प्रस्ताव

By जितेंद्र दखने | Updated: July 1, 2023 20:26 IST

भार होणार हलका : राज्य शासनाकडे नवीन डिजिजनचा प्रस्ताव

जितेंद्र दखने

अमरावती : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे विभाजन करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे सादर केला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळताच आगामी काळात झेडपीचे दोन विभाग अस्तित्वात येणार आहे. परिणामी कार्यकारी अभियंता यांच्याकडील १४ तालुक्यांचा असलेला भार निम्म्यापेक्षा कमी होणार आहे. याशिवाय दोन कार्यकारी अभियंते ग्रामविकासाच्या कामांच्या धुरा सांभाळतील. जिल्ह्यात १४ तालुके असून भौगोलिक क्षेत्रफळ १२२३५ वर्ग किमी आहे. झेडपीचे ७ उपविभाग आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एका तालुक्यासाठी एक उपविभाग, चार उपविभागांसाठी १ विभागीय कार्यालय आणि ४ विभागांसाठी एक मंडळ कार्यालय अशी संरचना अस्तित्वात आहे.

याशिवाय या विभागाकडे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग मिळून ३७३०.८० लांबीचे रस्ते देखभाल दुरुस्तीकरिता आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे १४ उपविभाग असून, चार विभागीय कार्यालये आहेत. याउलट झेडपी बांधकाम विभागाकडे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाची एकूण ७४२९.५४ किलोमीटरची लांबी देखभाल दुरुस्तीकरिता असून एवढ्या मोठ्या लांबीची देखभाल दुरुस्तीसाठी ७ उपविभाग व एकच विभाग आहे. यासोबतच शासनाच्या विविध योजनांची हजारो कामे झेडपी बांधकामकडे आहेत. त्यामुळे एवढा मोठा कामांवर नियंत्रण ठेवणे हे एका डिव्हिजनला शक्य होत नाही. त्यामुळे झेडपीत एका तालुक्यास एक उपविभाग असावा, ७ उपविभागांचा भार केवळ एका कार्यकारी अभियंत्याकडे आहे. त्यामुळे आणखी एक कार्यकारी अभियंतापद निर्माण करणे आवश्यक आहे. नजीकच्या यवतमाळ झेडपीतसुद्धा झेडपी बांधकाम विभाग क़्रमांक एक आणि दोन असे दोन विभाग अस्तित्वात आहेत.बॉक़्स 

अचलपूरला होणार नवे डिव्हिजन !झेडपी बांधकाम विभागाचे दोन विभाग अस्तित्वात आल्यानंतर दुसरे डिव्हिजन कार्यालय हे अचलपूर किंवा मुख्यालयात राहणार आहेत. यात अचलपूर विभागात सहा तालुक्यांचा कारभार राहील. यात अचलपूर, चांदूर बाजार, धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी आणि दर्यापूर या तालुक्यांचा समावेश असेल. उर्वरित ८ तालुके अमरावती विभागात समाविष्ट असतील.

झेडपी बांधकाम विभागाचे दोन डिव्हिजनचा प्रस्ताव सीईओ, ॲडिशनल सीईओ यांच्या मार्गदर्शनात बांधकाम विभागाने तयार करून तो सीईओंच्या स्वाक्षरीने शासनाकडे सादर केला आहे. याला मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. मान्यता मिळताच यापुढे झेडपी दोन डिव्हिजन अस्तित्वात येतील.दिनेश गायकवाडकार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, झेडपी.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती