शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कापूसतळणी येथील तांदूळ तस्कराला अटक, १५४ क्विंटल धान्य जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:09 IST

अंजनगाव सुर्जी पोलिसांची कारवाई

वनोजा बाग (अमरावती) : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथून १५४.५० क्विंटल वजनाचा १८५ शासकीय तांदूळ बुधवारी रात्री १२ वाजता छापा टाकून जप्त करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला मात्र रात्रीच अटक करण्यात आली होती. पोलिसांकडून उशिरा झालेल्या या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले आहे.

पोलिस सूत्रांनुसार, मिर्झा गुफरान बेग ऊर्फ मुन्ना मुस्तफा बेग (४२, रा. नारायणपूर, कापूसतळणी) असे शासकीय तांदळाची तस्करी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २२ मार्च रोजी रात्री २ वाजता अंजनगाव सुर्जीचे तहसीलदार अभिजित जगताप यांच्या आदेशावरून ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी कापूसतळणीतील जामा मशिदीजवळ असलेल्या आरोपीच्या गोदामाजवळील पिकअप वाहन (एमएच २७ एक्स ८१५९) मधून १५४ क्विंटल ५० किलो शासकीय तांदळाची १८५ पोती व वाहन जप्त करून करण्यात आले. त्यापूर्वी २१ रोजी रात्री ८ वाजता कापूसतळणी बसस्थानकात तांदूळ तस्कर गुफरान ऊर्फ मुन्ना हा रहिमापूर पोलिस ठाण्याच्या वाहनात स्वार होताना दिसला. त्यालाच अंजनगाव पोलिसांनी पहाटे २ वाजता त्याला अटक केली.

नारायणपूरचा काही परिसर अंजनगाव पोलिस ठाण्याच्या आवारात आहे. तांदूळ तस्कर मुन्ना याचे गोदाम असलेला परिसर मात्र रहिमापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कापूसतळणीत येतो. येथूनच बीट जमादाराच्या डोळ्यात धूळ फेकून खुलेआम तांदळाची तस्करी होते. मुन्नाची माणसे घरोघरी जाऊन शासकीय रेशन दुकानातून मिळालेला तांदूळ खरेदी करून गोळा करतात. भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातही तांदळाची तस्करी केली जाते, अशी माहिती पुढे आली आहे.

याप्रकरणी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक नारायण शिवाजी काकडे यांच्या तक्रारीवरून गुफरान उर्फ मुन्ना याला अटक करून शासकीय वाहनासह तांदूळ असा ११ लाख ६३ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीAmravatiअमरावती