शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आरएफओ’ बढती परीक्षेसाठी विज्ञान पदवी सक्ती गुंडाळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 17:46 IST

राज्य शासनाच्या वनविभागात वनपाल ते वनक्षेत्राधिकारी (आरएफओ)पदी बढती देताना विज्ञान पदवी अनिवार्य आहे.

 अमरावती - राज्य शासनाच्या वनविभागात वनपाल ते वनक्षेत्राधिकारी (आरएफओ)पदी बढती देताना विज्ञान पदवी अनिवार्य आहे. मात्र, विज्ञान पदवी नसल्याने आतापर्यंत २४५ वनपालांना वनक्षेत्राधिकारीपदी बढती देता आली नाही. परंतु वनविभाग ही नियमावली गुंडाळणार असल्याचे संकेत आहेत.

वनविभागातील वनपालांची २५ टक्के पदे बढतीने भरण्यासाठी घेतल्या जाणाºया मर्यादित खातेनिहाय परीक्षेस फक्त पदवीधर वनरक्षकांनाच (फॉरेस्ट गार्ड) बसू देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवित पदवीधर नसलेल्या वनरक्षकांना मोठा न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अशाच प्रकारच्या सक्तीमुळे विज्ञान पदवीधर नसलेल्या २४५ वनपालांना वनक्षेत्राधिकारी पदाच्या बढती परीक्षा देता येत नसल्याचे वास्तव आहे. भरती नियमानुसार वनपाल पदावर तीन वर्षे सेवा झाल्यानंतर वनपालांना वनक्षेत्राधिकारी पदासाठी परीक्षा देता येते. मात्र, वनविभागाने फे ब्रुवारी २०१५ मध्ये ‘फॉरेस्टर टू आरएफओ’ पदोन्नती देताना विज्ञान पदवी अनिवार्य केली आहे. राज्यात विज्ञान पदवीप्राप्त ८७ वनपाल असून विज्ञान पदवी नसलेले  २४५ वनपाल आरएफओ पदापासून आजही वंचित आहेत. यापूर्वी वनविभागाने भरतीप्रक्रियेसाठी नियम, कायदा करताना राज्य घटनेच्या ३०९ कलामान्वये विधिमंडळ किंवा विधी व न्याय विभागाची मान्यता प्रदान केली नाही. त्यामुळे वनरक्षक ते वनपाल पदोन्नतीसाठी लावण्यात आलेली सक्ती, निर्बंधावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. वनरक्षकांच्या न्यायासाठी नागपूर येथील महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड्स अ‍ॅन्ड फॉरेस्टर्स युनियनने प्रदीर्घ लढा दिला आहे. न्या. कुरियन जोसेफ व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठाने शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी वनरक्षकांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे वनपाल ते वनक्षेत्राधिकारी पदोन्नतीसाठी घेतल्या जाणाºया विज्ञान पदवीची सक्ती लवकरच दूर होईल, असे संकेत युनियनच्या पदाधिकाºयांनी दिले  आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकGovernmentसरकार