शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार गावांतील दुष्काळस्थितीकडे ‘महसूल’ची डोळेझाक 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 1, 2023 17:41 IST

सुधारीत ५३ पैसेवारी : १३७८ गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी जाहीर

अमरावती : ऐन हंगामात पावसाची तूट व पीकवाढीच्या काळात ऑगस्ट महिन्यात मोठा खंड यामुळे सरासरी उत्पादनात कमी येणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील सुधारित पैसेवारी ५३ टक्के विभागीय आयुक्तांद्वारा मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये १३७८ गावांत दुष्काळसदृश स्थिती दर्शविण्यात आली तर ५८६१ गावांमध्ये ५० टक्क्यांवर पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

विभागात यंदाच्या पावसाळ्यात फक्त यवतमाळ जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. उर्वरित चार जिल्ह्यांत १५ ते ३२ टक्क्यांपर्यंत तूट राहिलेली आहे. माॅन्सून उशिरा आल्याने पेरणीला महिनाभर झालेला उशीर व त्यानंतर पिकेवाढीच्या काळात ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवसांपर्यंत अनेक तालुक्यात पावसाचा खंड राहिलेला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नजरअंदाज ६० पैसेवारी २८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती.यामध्ये सुधारणेला वाव असल्याने ३१ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणाऱ्या सुधारित पैसेवारीत विभागाचे काय चित्र राहते, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, अमरावती जिल्ह्यातील ४९४, वाशिम जिल्ह्यातील ७९३ व बुलडाणा जिल्ह्यातील ९१ गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी विभागीय आयुक्तांद्वारा जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र ५८६१ गावांतील दुष्काळसदृश स्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.५० टक्क्यांवर पैसेवारी असलेली जिल्हानिहाय गावे

अमरावती जिल्ह्यात १४९६ गावांत ५४, अकोला जिल्ह्यात ९९० गावांमध्ये ५३, यवतमाळ जिल्ह्यात २०४६ गावांमध्ये ५४ व बुलडाणा जिल्ह्यात १३२९ गावांमध्ये ५५ तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व ७९३ गावांमध्ये ४८ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. विभागातील ७२३९ गावांमध्ये सरासरी ५३ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळFarmerशेतकरीAmravatiअमरावती