शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत अव्वल राहण्यासाठी महसूल व पोलीस विभागात स्पर्धा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 21:09 IST

लाचखोरीमध्ये अव्वल राहण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासनामध्ये नेहमीच स्पर्धा असते. २०१० पासून या दोन विभागांची त्यासाठी चढओढ राहिली आहे.

संदीप मानकर अमरावती : लाचखोरीमध्ये अव्वल राहण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासनामध्ये नेहमीच स्पर्धा असते. २०१० पासून या दोन विभागांची त्यासाठी चढओढ राहिली आहे. महापालिका व पंचायत समित्यांनीदेखील यादीत तिसरा-चौथा क्रमांक पटकावत ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून देत आहेत. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडून मिळालेल्या राज्यस्तरीय आकडेवारीवरून २०१० च्या तुलनेत २०१७ मध्ये सापळ्यांच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.  १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१० या वर्षभराच्या कालावधीत एसीबीने लाचखोरीविरोधात ४८६ सापळे यशस्वी केले. यामध्ये ६०८ आरोपींना अटक करण्यात आली. या वर्षात लाचखोरीत पहिल्या क्रमांकावर १०९ ट्रॅपसह पोलीस प्रशासन होते. दुसरे स्थान महसूल विभागाने (९५ ट्रॅप) राखले. महापालिका (३९) व पंचायत समिती (३८) चौथ्या स्थानी होती. २०१२ या वर्षात २०१० च्या तुलनेत ट्रॅपमध्ये किंचित वाढ झाली. या वर्षात एकूण ४८९ सापळ्यांमध्ये ६३३ जणांना ताब्यात घेतले. या वर्षातही पोलीस प्रशासन १२७ ट्रॅपसह अव्वल स्थानी होते. पाठोपाठ महसूल (९९) विभाग होता. यावेळी मात्र महापालिका विभागाने (३१) तिसरा व पंचायत समिती विभागाने (२४) चौथा क्रमांक घेतला. २०१७ च्या आकडेवारीनुसार ८७५ सापळ्यांची या वर्षात राज्यात नोंद झाली. यामध्ये ११४७ जणांना अटक करण्यात आली. यावर्षी महसूल (२०७) पहिल्या स्थानी, तर पोलीस विभाग (१६९) दुसºया क्रमांकावर आहे. पंचायत समित्यांमध्ये ९७, तर मनपा क्षेत्रात ६५ ट्रॅप करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागात भ्रष्टाचाराची अनेकानेक प्रकरणे उघडकीस येत असतानाही हा विभाग मात्र लाचखोरीची प्रकरणे दाखल होण्याच्या विषयात माघारला आहे, हे  विशेष!२०१५ मध्ये हजारांवर ट्रॅप१ आॅक्टोबर २०१३ रोजी प्रवीण दीक्षित यांनी पोलीस महासंचालक (एसीबी) या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे नोंदविण्यात आले. २०१५ मध्ये तब्बल १२३४ ट्रॅप यशस्वी झाले. यामध्ये १५९३ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये  महसूलचे ३०८ व पोलिसांचे २७६ ट्रॅप झाले. तिसºया क्रमाकांवर पंचायत समिती विभाग (१३९) होता. महापालिकांमध्ये ७२ सापळे यशस्वी झाले. 

जानेवारी २०१८ मध्ये ७९  सापळे-१ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१८  दरम्यान एकूण ७९ सापळे राज्यातील एसीबीच्या पथकांनी यशस्वी केले असून, यामध्ये १०० जणांना आरोपी करण्यात आले आहे. लाचखोरांकडून १९ लाख १७ हजार १०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAmravatiअमरावती