शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकांची लागवड करतात.

ठळक मुद्देखर्च निघणेही कठीण : शेतात पाणी, तूर-कपाशी पिकासाठी धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : जिल्ह्यात मोसमी पाऊस सर्वत्र संततधार कोसळल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अगोदर संततधार पावसाने पिकांवर आलेल्या रोगराईने हाहाकार माजविला. त्यात सखल भागातील काही शेतांमध्ये अजूनही पाणी साचले आहे. आता परतीचा पाऊस आला, तर तूर, सोयाबीन, मिरची पिकांसाठी तो धोकादायक ठरणार आहे.गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकांची लागवड करतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाला भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी पिकाची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड केली होती. मात्र, यंदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसात ही पिके कोलमडून पडली. सोयाबीन पीक यंदा कमी पावसामुळे येणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाने अर्धा पावसाळा उलटल्यावर आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीपासून पावसाने कहरच केला. यादरम्यान संततधार पावसाने अनेकदा शेतात पाणी साचले होते. या साचलेले पाण्याने पिकांवर निरनिराळ्या रोगांनी खरीप पिके धोक्यात आली, शिवाय ती पिवळी पडली.आधीच सततच्या पावसाने खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. परंतु, आता सोयाबीन पीक हातात आले असताना, ऐन मळणीच्या वेळीच परतीचा पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक होत्याचे नव्हते झाले आहे. हाती काहीच आलेले नसल्याने तूर, कपाशी पिकावर आलेल्या रोगाकरिता औषधाची फवारणी कशी करावी, असा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे आहे.तालुक्यात सोयाबीन पिकावर रोग आला असल्याने कुठे पिकांमध्ये जनावरे घातली, तर काही शेतकऱ्यांनी तीन महिन्यांची वाया जाऊ नये म्हणून मिळेल ते पीक काढून घेण्यासाठी धडपड चालविली आहे. त्यांना अवघे एकरी दोन ते तीन क्विंटल सोयाबीन पीक मिळत आहे.कोरोनाकाळात प्रदूषणाला आळा बसल्याने पाऊस चांगला कोसळण्याचे भाकीत वर्तविले जात होते. त्यानुसार पाऊसदेखील कोसळला. मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. खरिपाच्या सुरुवातीपासून पिकांच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी खर्च केला. मात्र, आज पीक घरात येताना मोबदला तर दूर, खर्च निघणेही कठीण झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती