शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

परतीचा पाऊस सोयाबीन, कपाशीच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 5:00 AM

प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागात मतभिन्नता असली तरी जिल्हा प्रशासनात मात्र परतीचा पाऊसच गृहीत धरला जात आहे.

ठळक मुद्देहंगाम बाधित : शेंगांना कोंब, पिकांचे सरासरी ७५ टक्के नुकसान, हंगामात शेतकऱ्यांच्या घरी पीक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयाबीन सवंगणीचा हंगाम सुरू होताच परतीच्या पावसालाही सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटायला लागले आहेत. भारी जमिनीतील कपाशीची बोंडगळ सुरू झाली आहे. दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागात मतभिन्नता असली तरी जिल्हा प्रशासनात मात्र परतीचा पाऊसच गृहीत धरला जात आहे. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने लावलेली रिपरिप सप्टेंबर संपत असतानाही सुरू आहे. रोज कुठे ना कुठे पावसाची नोंद होत आहे. सतत ढगाळ वातावरण व पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. पेरणीच्या काळात गायब झाल्यानंतर पावसाने धरलेला जोर अद्यापही संपलेला नाही.पावसात मूग, उडीद ही पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली. आता सोयाबीनचा हंगाम सुरू होतो. मात्र, सततच्या पावसामुळे काप्लेक्स स्थिती निर्माण झालेली आहे. मुळकूज, खोडकुज, चक्रीभुंगा, मोझॅक आदींमुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात किमान ५० ते ६० टक्के घट झाली आहे. सवंगणीच्या काळातदेखील पाऊस पिच्छा सोडत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. जमिनीत आर्द्रता असल्याने कापणी करता येत नाही. अशा विपरीत परिस्थितीत शेंगाना कोंब फुटायला लागले आहेत. नगदी पीक या अर्थाने शेतकरी सोयाबीन पेरतात. यंदा तीन लाख हेक्टरपैकी ७५ टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे.कपाशीवर बोंडअळी अन् बोंडगळमूग, उडिदापाठोपाठ सोयाबीनही हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आशा कपाशीवर आहेत. मात्र, बहुतांश भागातील कपाशीवर यंदाही गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्याने बुरशीजन्य रोग व ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पावसामुळे कपाशीची बोंडे काळी पडून गळ व्हायला लागली आहे. शेतकऱ्यांना फवारणीला पुरेसा अवधी या प्रतिकूल वातावरणामुळे मिळालेला नसल्याने यंदा कपाशीचेही पीक हातचे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.मेळघाट माघारले, जिल्ह्यात सरासरी पारजिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत ७४९.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा ७७९.६ मिमी पाऊस झाला आहे. ही टक्केवारी १०५ आहे. धामणगाव रेल्वेसह चिखलदरा व धारणी तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी पार केली आहे. यामध्ये अमरावती ११० टक्के, भातकुली १२१, नांदगाव खंडेश्वर १२५, चांदूर रेल्वे १०९, तिवसा १११, मोर्शी १२२, वरूड १२६, दर्यापूर १४३, अंजनगाव सुर्जी १३१, अचलपूर ८६, चांदूर बाजार १३०, धामणगाव रेल्वे ८७, चिखलदरा ५८ व धारणी तालुक्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती