शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कुटुंब नियोजनात जिल्हा माघारला

By admin | Updated: January 7, 2016 00:20 IST

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत यंदा जिल्हा माघारणार असून उद्दिष्टापेक्षा केवळ सहा टक्के शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

११ महिन्यांत साडेतीन हजार शस्त्रक्रिया : उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपडमोहन राऊ त अमरावतीकुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत यंदा जिल्हा माघारणार असून उद्दिष्टापेक्षा केवळ सहा टक्के शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. १४ तालुक्यात १० हजार ६९५ पैकी ३ हजार ४११ जणांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत़ जिल्ह्यात यंदा १० हजार ६९५ असे उद्दिष्ट १४ तालुक्याला दिले आहे़ आतापर्यंत केवळ ३ हजार ४११ शस्त्रक्रिया झाल्या आहेत़ यात ३१४ पुरूषांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. तिवसा तालुक्यात २८२ जणांनी नसबंदी केली तर दर्यापूर तालुक्यात ८११ उद्दिष्टांपैकी ४०२ जण नसबंदी शस्त्रक्रियेला सामारे गेले आहेत. वरूड तालुक्यात ९८१ पैकी ४५१ अमरावती ६४३ पैकी २६६, अचलपूर तालुक्यात १ हजार ३८४ पैकी ५५५, धामणगाव रेल्वे ६३६ पैकी २३५, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६१५ पैकी २२० चांदूररेल्वे ४४९ पैकी १२९, मोर्शी ८८० पैकी १९८, भातकुलीत केवळ ५९ जणांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली, धारणी तालुक्यात ९२० पैकी ३७ जणांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या. ३७ शस्त्रक्रिया केंद्रात अनुभवी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शस्त्रक्रियेचे उदिष्ट पूर्ण होणे शक्य नसल्याची माहिती आरोग्यविभागाकडून आली आहे़ कुटुंब नियोजनाबाबत शासनाकडून योग्य ती जनजागृती केली जाते. मात्र, त्या तुलनेत उद्दिष्ट्यपूर्ती झाली नसल्याचे चित्र आहे. जिल्हा माघारल्याचे एकूण चित्र यामध्ये दिसून येत आहे.अचलपूर तालुका अव्वलकुटुंब नियोजन शस्त्रक्रि येत जिल्ह्यातील १४ तालुक्यात अचलपूर तालुक्याचा क्रमांक पहिला लागतो तर दुसरा क्रमांक अंजनगाव सुर्जी, वरूड दर्यापूर, तिवसा, धामणगाव, तालुक्याचा आहे़ जिल्हा परिषदेचा आरोग्यविभागही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया धडक मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावला आहे.पुरूषांच्या शस्त्रक्रियेची सोपी पध्दतपुरूष नसबंदीसाठी आरोग्य विभागाने प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे़ पुरूष शस्त्रक्रिया अतिशय सोपी आणि सुटसुटीत असेते़ महिलांवर शस्त्रक्रिया केल्यास किमान सात दिवस रूग्णालयात राहावे लागते़ तसेच शस्त्रक्रियेनंतर अन्य शारीरिक व्याधी सुरू होण्याचा धोकाही असतो़ पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया १५ मिनिटांत होते़ अर्ध्या तासात संबंधित रूग्ण घरी जाऊ शकतो़ त्यामुळे पुरूषाला कोणताही त्रास जाणवत नाही़ नसबंदी केल्यास शासनाकडून १५०० रूपयांचे अनुदान मिळते, हे जरी खरे असले तरी आजही याबाबत अनेक दंतकथा प्रसिध्द आहेत. त्यामुळेच महिलांवरच या शस्त्रक्रिया करतात़ एका वर्षात केवळ ३१४ पुरूषांनी नसबंदी केली आहे महिलांचा दृष्टिक ोण बदलने महत्त्वाचे बाळंतपण झाल्यानंतर काही महिला कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी तयार होतात़ किंबहुना पुरूषांची नसबंदी म्हणजे अघटित घडते, असा समज अद्यापही अनेक ठिकाणी रूढ आहे़ त्यामुळे रूग्णालयात दाखल महिलांसमोर डॉक्टरांनी पुरूष नसबंदीचा प्रस्ताव ठेवला तर महिलाच त्याला नकार देतात, असे चित्र आहे. प्रबोधन मिळणार कधी?ज्यावेळी एखादी महिला शस्त्रक्रियेसाठी दाखल होते तेव्हा संबंधित दाम्पत्याचे प्रबोधन होऊन त्यांच्यासमोर विकल्प ठेवले पाहिजेत़ संतती नियमन अथवा पुरूष नसबंदी असे विकल्प दिल्यास महिलांना शस्त्रक्रियेचा त्रास होणार नाही़ पुरूष शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढण्यासाठी आता मतपरिवर्तन करणे ही काळाची गरज बनली आहे़