शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सेवानिवृत्त शिक्षक वेतन आयोगाच्या हप्त्यासाठी झेडपीवर धडकलेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 13:08 IST

Amravati : जिल्हा परिषदेत थकीत असलेल्या वेतन आयोगातील रकमेसाठी धडकले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, शिक्षिका

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवा कालावधी पूर्ण करून निवृत्त झालेल्या जिल्हाभरातील सुमारे १ हजारांवर शिक्षक, शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या सातव्या वेतन आयोगातील एक नव्हे, तर सलग तीन हप्त्यांची रक्कम सेवानिवृत्ती झाल्यानंतरही मिळालेली नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त निवृत्ती शिक्षकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्याकडे निवेदन देवून न्याय देण्याची मागणी सोमवारी केली आहे.

जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून आपला सेवा कालावधी पूर्ण करून निवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना निवृत्त होऊन चार ते पाच वर्षे लोटून गेले; परंतु सातव्या वेतन आयोगाद्वारे मिळणाऱ्या हप्त्याची पहिली रक्कम सोडली तर त्यानंतर दुसरी, तिसरी आणि चौथ्या हप्त्याची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. एवढेच काय तर गटविमा योजनेची रक्कम मिळालेली नाही. यामुळे हक्काचा पैसा मिळावा यासाठी सेवानिवृत्त झालेल्या हजारो शिक्षकांनी ही रक्कम मिळावी म्हणून प्रशासनाकडे सतत पत्रव्यवहार केला, निवेदनही दिले; परंतु पुढे काहीच नाही झाले. परिणामी, जिल्हाभरातील सेवानिवृत्त झालेल्या हजारावर शिक्षकांना सन २०१६ ते २०२३ पर्यंत सातव्या वेतन आयोगाच्या तीन हप्त्याची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. 

त्यामुळे वेतन आयोगाच्या थकीत हप्त्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, गटविम्याची रक्कमही थकीत आहे. ही रक्कम सुध्दा त्वरीत मिळावी आणि सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तिवेतन १ तारखेला मिळावे, आदी मागण्या आठवड्यात निकाली काढाव्यात, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा सेवानिवृत्त शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक श्याम पाटी, दीपक मुळे, वासुदेव रेचे, संजय वानखडे, मनोहर चर्जन, दिलीप चौधरी, प्रभाकर देशमुख, राजू खारकर, प्रशांत गुल्हाने, इकबाल अहेमद, मो. शकील, अ. रहेमान, विनोद कुन्हेकर, पुंडलिक वितोंडे, सुरेंद्र वाडेकर, मारोती फुटाणे, सविता चर्जन, शीला उल्हे, नलिनी लंगडे, धनराज राऊत, दिनेश कनेटकर व अन्य शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती