निवृत्त शिक्षकाचे अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST2021-07-12T04:09:16+5:302021-07-12T04:09:16+5:30

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात निवृत्त शिक्षकाने १२ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य ...

Retired teacher flirts with underage girl | निवृत्त शिक्षकाचे अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

निवृत्त शिक्षकाचे अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात निवृत्त शिक्षकाने १२ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केले. मुलीने वेळीच धोका ओळखून शेजारी पळ काढल्याने अघटित टळले.

याप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीनुसार, ६२ वर्षीय निवृत्त शिक्षक ९ जुलै रोजी त्यांच्या गावी आला होता. त्यावेळी ते शेतात गेले होते. घरी १२ व ८ वर्षीय आणि अन्य १२ वर्षीय मुलगी होती. बारा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केले. मी तुला पैसे देतो, तू माझे काम कर, असे आमिष दाखविले. यामुळे घाबरलेल्या मुलीने शेजारच्या घरी पळ काढला व त्यांना घडलेला प्रकार सांगितला.

तिचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांनी रहिमापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ४५२, ३५४ अ सह पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला व त्याला १० जुलै रोजी अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस ठाणेदार सचिन इंगळे करीत आहेत.

Web Title: Retired teacher flirts with underage girl