दर्यापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीला दर्यापूर तालुक्यामध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला. मनसे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायगोले यांच्या हस्ते सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली. तालुकाध्यक्ष मनोज तायडे यांच्या नेतृत्वाखाली सदर नोंदणी करण्यात आली. तालुका उपाध्यक्ष पंकज कदम, गोपाल तराळ, राम शिंदे, गौरव लाजूरकर, शुभम रायबोले, शुभम लाजूरकर, अक्षय ठाकरे, संतोष रामेकर, दादाराव तायडे, संदीप राणे, आकाश गुप्ता, शुभम राऊत, करण रायबोले, राम जोशी, हर्षद अबाडकर, विनीत इंगळे, कमलेश शर्मा, चेतन खोपे, मंगेश गवई, योगेश पावडे, प्रथमेश राऊत, सोपान धांडे, अनिकेत सुरपाटणे, राहुल सुरपाटणे, शुभम धर्माळे, उमेश बुध आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दर्यापूर येथे मनसेच्या सदस्य नोंदणीला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:12 IST