शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आठ विद्यापीठांकडे वनवणवा संशोधनाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:08 IST

दरवर्षी जंगलात वणवे पेटून मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होते. यावर प्रभावी उपाय योजण्यासाठी राज्यातील आठ विद्यापीठांकडे संशोधनाची जबाबदारी वनखात्याने सोपविली आहे.

ठळक मुद्देआगीपासून जंगल सुरक्षिततेसाठी शोधणार उपाययोजना वन विभागाकडून विद्यापीठांना मिळणार निधी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षी जंगलात वणवे पेटून मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होते. यावर प्रभावी उपाय योजण्यासाठी राज्यातील आठ विद्यापीठांकडे संशोधनाची जबाबदारी वनखात्याने सोपविली. या हंगामातील वनवणवा नियंत्रणासाठी या संशोधनाचा उपयोग व्हावा, यादृष्टीने त्यासाठीचा निधी वितरित करण्यात येणार आहे. एकूण आठ विषयांवर हे संशोधन होत असून, प्रतिविषय दोन लाखांचा निधी दिला जाणार आहे.१५ फेब्रुवारी ते १५ जून असा वनवणवा कालावधी गृहीत धरला जातो. वणवा रोखण्यासाठी विद्यापीठांच्या संशोधनातून उपलब्ध होणारे उपाय प्रभावी ठरू शकले, तर त्याचा मोठा लाभ निसर्गसाखळी अबाधित राखण्यास होऊ शकेल. या संशोधनकार्यात सहभागी असलेली राज्यातील विद्यापीठे अशी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ (लोणेरे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), शिवाजी विद्यापीठ, (कोल्हापूर), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (अमरावती), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ (नागपूर), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली).यंदाच्या १५ फेब्रुवारीपासून संशोधनाला प्रारंभ झाला आहे. एका संशोधन चमूत दोन प्राध्यापक आणि पाच विद्यार्थी आहेत. जंगलात जाऊन वनवणव्यासंदर्भात ही चमू अभ्यास करणार आहे. १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत संशोधनाचा वस्तुनिष्ठ अहवाल वनमंत्रालयाकडे सादर करावा लागेल. शासनाने वनवणवा संशोधन व सर्वेक्षणासाठी निधीला मान्यता दिली आहे.जंगल आणि वन्यजीव ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांचे संरक्षण, संवर्धनाची जबाबदारी ही सर्वांचीच आहे. संशोधन, सर्वेक्षणातून पुढे आलेल्या उपाययोजना तात्काळ लागू केल्या जातील.- हरिश्चंद्र वाघमोडे,विभागीय वनाधिकारी, अमरावती.या विषयावर होणार संशोधन, सर्वेक्षण- वनवणवा प्रतिबंधक व व्यवस्थापनासाठी वने, स्थळांच्या विशेष माहितीचे ज्ञान संपादन- १५ फे ब्रुवारी ते १५ जून २०१९ असा वन वणवा कालावधीचा अभ्यास- फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडिया या सॅटेलाइटवर अधिकारी, वनकर्मचाऱ्यांचे मोबाइल नोंदणी- डिसेंबर २०१८ मध्ये झालेली जंगलक्षेत्र फायर लाइन कटाई- १५ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचे जाळरेषा कामांची वस्तुस्थिती- संयुक्त वनव्यवस्थापन समितीला प्रोत्साहनपर बक्षीस योजना- वनकर्मचारी अहवालात चेकलिस्ट, मार्गदर्शक तत्त्वे- जंगल क्षेत्राचे फायर आॅडिट

टॅग्स :forestजंगलfireआग