लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रजासत्ताक दिनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास चांदूररेल्वे ठाण्याच्या हद्दीतील बासलापूरजवळ एका ठिकाणी घडली. अब्दुल हुजैफ शेख वारीस (१७, रा. छायानगर, अमरावती) असे मृताचे नाव आहे.छायानगरातील अब्दुल हुजैफ हा शाळेतील कार्यक्रम आटोपून चार मित्रांसोबत मालखेड रोडवर फिरायला गेला होता. दरम्यान, बासलापूरजवळील पारधी तलावावर ते सगळे गेले. अब्दुल हुजैफ हा तलावात पोहण्यासाठी उतरला आणि गाळात अडकून पाण्यात बुडाला. तो बुडाल्याचे पाहून त्याच्या अन्य मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, जवळ कोणीच नव्हते. त्यांनी चांदूररेल्वे पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृताच्या नातेवाइकांना बोलावून घेतले. सायंकाळी ४ च्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. चांदूररेल्वे रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नातेवाइकांनी मृतदेह अत्यंसंस्कारासाठी घरी नेला. या प्रकरणाची पुढील चौकशी चांदुरेल्वे पोलीस करीत आहे.मृताच्या नातेवाइकांचे वाहन अडविलेअब्दुल हुजैफचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांची छायानगरात गर्दी जमली. रात्री उशिरापर्यंत नातेवाइकांची ये-जा सुरू होती. दरम्यान, बाहेरगावातून आलेल्या नातेवाइकांचे चारचाकी वाहन नागपुरी गेट चौकात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी अडविले. ओव्हरसीट वाहन असल्याच्या कारणावरून मेमो घेण्यासाठी नातेवाइकांवर दबाव आणला जात असल्याचे पाहून काही नागरिकांनी मध्यस्थी केली. त्यानंतर पोलिसांनी त्या वाहनाला सोडले. अंत्यविधीतील नागरिकांनाही वेठीस धरण्याचा प्रकार नागपुरी गेट व वाहतूक शाखेतील एका पोलिसाने केल्याचे निदर्शनास आले होते.
अमरावती जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी तरुणाचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 18:38 IST
प्रजासत्ताक दिनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास चांदूररेल्वे ठाण्याच्या हद्दीतील बासलापूरजवळ एका ठिकाणी घडली.
अमरावती जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी तरुणाचा तलावात बुडून मृत्यू
ठळक मुद्दे गाळात रुतल्याने झाली दुर्घटना