शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

कठड्यांचा दर्जा निकृष्ट, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवा

By admin | Updated: May 24, 2015 00:30 IST

कित्येक लोकांचे बळी जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बाभळी येथील धोकादायक पुलाला नगरपालिकेने निकृष्ट दर्जाचे ...

मागणी : दर्यापूरचा ‘तो’ पूल ठरतोय जीवघेणादर्यापूर : कित्येक लोकांचे बळी जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बाभळी येथील धोकादायक पुलाला नगरपालिकेने निकृष्ट दर्जाचे कठडे बसविल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जयंत वाकोडे यांनी दर्यापूरच्या मुख्याधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.विविध समस्यांनी ग्रस्त बाभळीवासीयांना नदीपात्रातून कसेबसे वाटचाल करीत बनोसा शहर गाठावे लागत होते. वर्षभर बाभळीवासी या नदीतून मार्गक्रमण करुन बनोसाची बाजारपेठ गाठत असत.बाभळीच्या नागरिकांनी सोय व्हावी म्हणून त्याकाळी नगरपरिषदेने हा छोटा पूल बाभळीवासीयांच्या सेवेसाठी बांधून दिला. तोपर्यंत या ठिकाणी एकाही व्यक्तीने जीव गमवला नव्हता. परंतु पूल झाल्यापासून आजपर्यंत कधी पुलावरुन पाय घसरुन तर कधी डोहात पडून अनेकांचे बळी गेले आहे. धोकादायक पुलावर संरक्षक कठडे बांधण्यासाठी काही नगरसेवकांनीच विरोध केला होता असा आरोप जयंत वाकोडे यांनी केला आहे. परंतु मनसेने आपली मागणी रेटून धरल्यामुळे नगर पालिका प्रशासनाला त्याठिकाणी कठडे लावण्यासाठी मुहूर्त सापडला. कठडे लावण्याची इच्छाच नसलेल्या काही नगरसेवकांमुळे मुख्याधिकारी पानझाडे यांनी कसेबसे कठडे उभे केले. यासंदर्भाची चौकशी वरिष्ठांनी करावी, असे जयंत वाकोडे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)अनेकांचे बळी घेणारा पूलदर्यापूर- बाभळी येथील जुळ्या शहरांना जोडणारा हा पूल अतिशय धोकादायक असून गणपती विसर्जन असो की, दुर्गा विसर्जन या काळात येथे अनेकांचे बळी गेले आहेत. कुणी नदीच्या डोहात पडून तर कुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे.परंतु नगर पालिका प्रशासनाने या जीवघेण्या पुलावर थातूरमातूर कठडे लावून नागरिकांच्या जिवाशी एकप्रकारे खेळच चालविला आहे.