शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रसामुग्रीवर भाडे आकारणी; पदाधिकारी विरुद्ध प्रशासन

By admin | Updated: April 16, 2017 00:10 IST

महपालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या यंत्रसामग्रीवर भाडे आकारणी करण्यात आल्याने प्रशासन आणि पदाधिकारी समोरासमोर ठाकले आहेत.

टँकर पुरविण्यावेळी वाद : आमसभा गाजण्याचे संकेतअमरावती : महपालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या यंत्रसामग्रीवर भाडे आकारणी करण्यात आल्याने प्रशासन आणि पदाधिकारी समोरासमोर ठाकले आहेत. महापालिका प्रशासनाने टँकरसह जेसीबी, रोडरोलर, टिप्पर पुरविण्याच्या मोबदल्यात प्रति तास शुल्क आकारणी निश्चित केली आहे. तथापि आम्ही लोकांचेच काम करतो, या सबबीखाली बहुतांश नगरसेवकांनी भाडेआकारणीला विरोध दर्शविला आहे. पाण्याचा टँकरसाठी महापालिका प्रतितास ६७७ रुपये आणि लोडर ट्रॅक्टरसाठी ११२० रुपये प्रतितास आकारत असल्याने पदाधिकारी-प्रशासनातील वाद अधिक गडद होण्याचे संकेत आहेत. महापालिकेकडे असलेल्या यंत्रसामग्री तथा मशिनरी यावरील इंधन, वाहनचालक व त्यासंबंधी इतर बाबींवर वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात खर्च होत आहे. तसेच यंत्रसामूग्री तथा मशिनरीचे आयुष्य पूर्ण झाल्याने त्यावरील देखभाल व दुरूस्तीसाठी मोठा खर्च होत आहे. त्याअनुषंगाने महापालिकेची आर्थिक परिस्थिती सबळ नसल्याने नवीन यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नाही, असे निरीक्षण नोंदवून आयुक्तांनी ६ फेब्रुवारीपासून मनपाकडील यंत्रसामग्री वापराबाबत भाडेवसुलीचे निर्देश दिले. त्यासाठी जेसीबी, रोडरोलर, बॉबकट, टँकर, ट्रॅक्टरचे प्रति तास भाडेही निश्चित करून दिले. आलेल्या निधीमधून भविष्यात नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्याचा आयुक्तांचा मानस आहे. फेब्रुवारीत आदेशाची अंमलबजावणी केली. मात्र मागील आमसभेत विरोधी पक्षनेत्यांसह बसपचे गटनेते चेतन पवार यांनी याबाबत आवाज उठविला. ६७७ रुपये प्रतितास टँकरच्या भाडे आकारणीवर आक्षेप घेण्यात आला. टँकर असो वा जेसीबी प्रभागातील कामासाठी वापरला जातो. त्याचे भाडे आम्ही का भरावे, किंवा ती रक्कम आमच्या वॉर्ड विकास निधीतून का कपात करायची, असा बहुतांश नगरसेवकांचा प्रश्न आहे. शुल्क भरल्याशिवाय टँकर पाठविला जाणार नाही, असे सांगितले जाते, असे उदाहरण उद्धृत करून काँग्रेसच्या नगरसेविका निलिमा काळे यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले होते. (प्रतिनिधी)नगरसेवकांनाही ‘चार्ज’महापालिकेच्या नगरसेवकांकडून खासगी जागेवर कामे सुचविण्यात आल्यास नव्या दरपत्रकाप्रमाणे नगदी स्वरुपात रक्कम वसूल करूनच कामे करावीत, असे आयुक्तांचे निर्देश आहेत.वाहननिहाय हिशेब ठेवण्याचे निर्देशयंत्रसामग्री वापराबाबत नव्या दराने भाडे आकारणीसाठी स्वतंत्र पावती पुस्तक ठेवण्यात यावे, तसेच शासकीय ठिकाणी कामे करावयाची असल्यास नगरसेवकांच्या वॉर्ड विकास निधीमधून रक्कम वजा करण्याकरिता वाहननिहाय स्वतंत्र हिशेब ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.-तर वाहनचालकांवर कारवाईकोणत्याही परिस्थितीत खासगी ठिकाणी विनापरवानगी महापालिकेच्या वाहनाचा वापर करू नये, केल्यास नगदी दंडासह वसुली करण्यात यावी व मंजूर असल्यास शासन नियमाप्रमाणे शुल्क वसूल करावे, परवानगीशिवाय तसेच मनपा हद्दीबाहेर कोठेही वाहन आढळल्यास वाहनचालक जबाबदार राहील. वाहनचालकाला जबाबदार धरून प्रथम वेतनातून वसुली व दुसऱ्यांदा आढळल्यास प्रशासकीय दंडनीय कारवाई केली जाणार आहे.