शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार, तरुणीचे फोटो अमेरिकेतून 'मॉर्फ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 13:20 IST

Amravati : स्थळ नाकारले म्हणून रचला तिच्या बदनामीचा कट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लग्नसंबंध जुळू न शकल्याने एका एनआयआर तरुणाने येथील एका तरुणीच्या छायाचित्रांचे अश्लील मॉफिंग केले. तो एवढ्यावर थांबला नाही, तर त्याने त्या तरुणीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. तथा खोटी वेबसाइटदेखील बनविली. त्या वेबसाइटवर फिर्यादी तरुणीचे नग्न, अर्धनग्न फोटो अपलोड करून तिची बदनामी केली. ११ जुलै २०२२ ते २ मार्च २०२४ या दरम्यान तो प्रकार घडला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी ८ जून रोजी दुपारी आरोपी पुर्विन वखारवाला (३५, रा. एलिन्स्टन पीएल, जॉन्स क्रिक, यूएसए) याच्याविरुद्ध विनयभंग, आयटी अॅक्ट बदनामीचा गुन्हा दाखल केला.

व सन २०२२ मध्ये आरोपी पुर्विन वखारवाला हा फिर्यादी तरुणीला लग्नसंबंधाच्या निमित्ताने पाहणी करण्यास आला होता. मात्र तरुणीकडील मंडळींला ते स्थळ पसंत नसल्याने त्यांनी नापसंती दर्शविली. तसे त्याला कळविण्यातदेखील आले. मात्र त्यानंतर आरोपीने व्हॉट्सअॅप, ई- मेल अशा विविध माध्यमांतून फिर्यादी तरुणीची इच्छा नसताना तिचा ऑनलाइन पाठलाग करून संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणीने त्यास स्पष्ट नकार दिल्याने त्याने चिडून जाऊन तिची बदनामी केली.

आयएसडी कॉल आरोपीने फिर्यादीचा चेहरा वापरून तिचे अश्लील छायाचित्रे तयार केली. ती एफबीवर प्रसारित केली. व्हॉट्सअॅप, ई-मेलद्वारे तरुणीचे नातेवाईक व मित्र, मैत्रिणींना पाठविले. तसेच तिला रात्री अपरात्री आयएसडी कॉल करून तिचा ऑनलाइन पाठलाग केला. फिर्यादीच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाइल आणि फेक वेबसाइट तयार केली. तथा वेबसाइटवर नग्न, अर्धनग्न फोटो अपलोड करुन त्याने तरुणीची बदनामी केली. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती