शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आयपीएस यादवचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, एसीबीकडून तीन मुद्द्यांचा जबाब सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 18:57 IST

अवैध रेतीचा पकडलेल्या ट्रकसंदर्भात चार्जशिट न्यायालयात सादर न करण्यासाठी एक लाखाची लाच घेणारा आयपीएस विजयकृष्ण यादव याचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेडचे चौथे जिल्हा न्यायाधीश सय्यद अकबर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या तपास अधिका-यांनी सादर केलेल्या जबाबामधील तीन प्रमुख मुद्द्यांमुळे फेटाळून लावला आहे.

अमरावती - अवैध रेतीचा पकडलेल्या ट्रकसंदर्भात चार्जशिट न्यायालयात सादर न करण्यासाठी एक लाखाची लाच घेणारा आयपीएस विजयकृष्ण यादव याचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेडचे चौथे जिल्हा न्यायाधीश सय्यद अकबर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या तपास अधिका-यांनी सादर केलेल्या जबाबामधील तीन प्रमुख मुद्द्यांमुळे फेटाळून लावला आहे.

नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील पंजाब रेस्टॉरंटमध्ये ३० जानेवारी २०१८ रोजी दुपारी १ ते २ या वेळेत सन्नीसिंग बंगुई या युवकाने तेथील इतवारा उपविभागाचे आयपीएस अधिकारी जी. विजयकृष्ण यादव यांच्यासाठी एक लाख रुपयाची लाच स्वीकारली. त्यावेळी अमरावती एसीबीच्या पथकाने त्या युवकाला जेरबंद केले. अर्धापूर पोलीस ठाण्यात त्याच्यासह आयपीएस यादवविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या युवकाला नांदेडच्या विशेष न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली व दुसºया दिवशी जामीन मंजूर झाला. आयपीएस यादव हा त्यावेळी हैदराबाद येथे प्रशिक्षण घेत होता आणि तेथूनच गायब झाला. त्यानंतर त्याच्या निलंबनाचे आदेश निघताच ७ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता.एसीबीचे पोलीस निरीक्षक राहूल तसरे यांनी ९ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा न्यायालयात जबाब सादर केला. त्यामधे यादवने  ५ सप्टेंबर २०१७ रोजी हैदराबाद येथे झालेल्या लाच मागणी पडताळणीच्या वेळी एपी २१ बीडी ५९९१ ही चारचाकी गाडी वापरली होती. ती जप्त करायची आहे तसेच त्यातून काही पुरावे भेटतात का, याची पडताळणी व्हायची आहे. याशिवाय यादवने तक्रारदार हरिहर पुरी यांच्याकडून पूर्वीच एक लाख रुपये घेतले होते, तेसुद्धा जप्त करणे आहे. त्याने मोबाइलवर लाच मागणीचे संदेश पाठविले आहेत तसेच अनेकदा लाचेची बोलणी केली आहे. यामुळे त्याची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे एसीबीने नमूद केले. या मुद्द्यांवर न्या. सय्यद अकबर अली यांनी जमीन अर्ज फेटाळला. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने अमरिकसिंग वासरीकर आणि रणजित देशमुख यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. चालकाने केली अधिका-याला मदतआयपीएस यादव याच्या शासकीय वाहनाच्या चालकाने अटकपूर्व जामीनप्रकरणात खूप प्रयत्न केले. याशिवाय तो विनापरवानगी यादवसोबत हैदराबाद येथे तीन दिवसांसाठी गेला होता, अशी माहिती वरिष्ठ अधिकाºयांना प्राप्त झाल्यानंतर त्याला  पुन्हा इतवारा येथे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नांदेड येथील आयपीएस यादव याच्या घराची झडती घेतली. तेथे काहीच आढळून आले नाही. आरोपीचा शोध लवकरात लवकर घेतला जाईल.-  राहुल तसरे,(तपास अधिकारी, एसीबी, अमरावती विभाग 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAmravatiअमरावती