शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

मंदिरापेक्षा गावच्या शाळांचा जीर्णोद्धार महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

समाजातील दानशूर व्यक्तींनी नवीन मंदिर उभारणी पेक्षा आपल्या गावच्या शाळांचा जीर्णोद्धार महत्त्वाचा ठरवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. ते तोंगलाबाद येथील माजी सरपंच ओंकारराव (बापू) जाधव व इंदिराबाई जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित श्री पांडुरंग हरी आश्रम सुविधा लोकार्पण व कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : समाजातील दानशूर व्यक्तींनी नवीन मंदिर उभारणी पेक्षा आपल्या गावच्या शाळांचा जीर्णोद्धार महत्त्वाचा ठरवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. ते तोंगलाबाद येथील माजी सरपंच ओंकारराव (बापू) जाधव व इंदिराबाई जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित श्री पांडुरंग हरी आश्रम सुविधा लोकार्पण व कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते.तालुक्यातील तोंगलाबाद-सौंदळी परिसरात असणाऱ्या श्री पांडुरंग हरी आश्रमात सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा समाजप्रबोधन कार्यक्रम देखील झाला. यावेळी माजी आमदार अरुण अडसड यांनी सदिच्छा भेट दिली. याशिवाय माजी आमदार तुकाराम बिरकड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, सुनील गावंडे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, निवृत्त शिक्षक मधुकरराव अंबरते, गिरीधर बोरखडे, निळकंठ टापरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी ना. कडू यांच्या वीर बाजीप्रभू नामक विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला ५० हजारांचा धनादेश जाधव कुटुंबाने दिला. हाच धनादेश व मातोश्री इंदिराबाई कडू यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आणखी एक लाखांचा धनादेश तोंगलाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ना. कडू यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त शिक्षक सदानंद जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय जिल्हा क्रीडा अधिकारी गणेशराव जाधव यांनी दिला. संचलन प्रा. देवलाल आठवले व प्रा. निलेश जळमकर यांनी केले. आश्रम संचालक अरुण जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.  

सहकार्य करणाऱ्यांचा सत्कारतोंगलाबाद येथील जाधव कुुटुंबातील अरुणराव व प्रकाश हे दोन पोलीस विभागात, सदानंद जाधव हे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक, गणेशराव जाधव हे जिल्हा क्रीडा अधिकारी, तर गजाननराव शेतकरी म्हणून कार्यरत आहेत. या कुटुंबाला सहकार्य करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.  

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूSchoolशाळा