नागरिकांची धावाधाव : रात्री ९.३० पर्यंत आरटीओचे कामकाज सुरूअमरावती : सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून भारत स्टेज ३ ( बीएस३) या वाहनांच्या विक्रीवर बंदी घातल्यानंतर विविध कंपनाच्या दुचाकी व चारचाकी वाहनात मोठ्या प्रमाणात सुट देल्याने ही आॅफर कॅश करण्यासाठी व वाहन खरेदी करण्यासाठी ३१ मार्चला शोरुममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे रजिस्ट्रेश्न करण्यासाठी ग्राहकांनी आरटीओमध्येसुद्धा धाव घेतली. त्यामुळे आरटीओचे कामकाज रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरु होते. १११२ वाहनांची नोंदणी यावेळी करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर यांनी "लोकमत"शी बोलताना सांगितले. विविध कंपन्याच्या वाहन विक्रेत्यांना अधिकृत आरटीओने लॉगिन आयडी दिला आहे. त्यांनी आरटीओच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. यासंदर्भाची माहिती अपडेट करण्याकरिता रात्री उशिरापर्यंत अनेक वाहनांचे रजीस्ट्रेशन प्रक्रि या करण्याचे कामकाज सुरू होते. ३१ मार्च या वर्षाचा शेवटचा आर्थिक वर्षीचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी वसूलीचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भागम्भाग सुरु होतीे. सकाळपासूनच विविध कंपन्यांच्या मध्ये व शोरुमच्या समोर दुचाकी व इतर वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. अनेकांना तर दुचाकी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. वाहनांमध्ये दुचाकी वाहनांची सर्वाधिक विक्री करण्यात आली आहे. ज्या कंपनीकडे नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी नियमाने कागदपत्रे सादर केली आहे. त्यांचे नोंदणीत ग्राह्य धरल्या जाईल, अशी माहिती आहे. (प्रतिनिधी)
बीएस ३ च्या १,१२२ वाहनांची नोंदणी
By admin | Updated: April 2, 2017 00:15 IST