कृषी विभागाचा सल्ला : गुलाबी बोंडअळीच्या प्रतिबंधास होते मदतअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात बोलागार्ड-२ कपाशीची लागवड करताना या कपाशीच्या पाकिटामधील बियाणे व रेफयूज (नॉन बिटी) प्रमाण दिलेले आहे. कीड प्रतिरोधक व्यवस्थापन धोरणानुसार बिटी कापूस तंत्रज्ञान, अधिक काळ चालू राहण्यासाठी रेफ्यूज (नॉन बिटी), कपाशीची लागवड अनिवार्य असल्याचा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ८६ हजार ६६५ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली होती. यंदाच्या हंगामात २ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड होणार आहे. शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकाचे संरक्षण करण्याकरिता पूर्वीच्या पिकांचे अवशेष नष्ट करावे लागतील. यामुळे जमिनीतील सुप्त अवस्थेतील किडी व अंडी नष्ट होतात. बोलगार्ड -२ कपाशीची लागवड करताना १ एकर क्षेत्रामध्ये ८० टक्के बोलगार्ड-२ कपाशीचे क्षेत्र गरजेचे आहे. त्याभोवती चारही बाजूने २० टक्के क्षेत्र ह रेफ्यूज (नॉनबिटी) असले पाहिजे. बहुतांश शेतकरी बोलगार्ड -२ कापूस बियाणे, १२० ग्राम रेफ्यूज बियाणे लागवड करीत नाही. निसर्गाच्या नियमानुसार आपण कोणताही जीव नष्ट करु शकत नाही. ही कपाशी लागवड करीत असताना अळ्यांना खाण्याकरिता कपाशीची झाडे हवीत. त्याकरिता रेफ्यूज बियाणे लावणे महत्त्वाचे आहे. ९० टक्के शेतकरी नॉन बीटी लावत नाहीत. मात्र बोलगार्ड-२ कापूस लावत असताना आसपास रेफ्यूज लावले की बोलगार्ड -२ कपाशीचे क्षेत्र होते, हा केवळ गैरसमज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
बिटीच्या क्षेत्रात रेफ्यूज लागवड अनिवार्य
By admin | Updated: May 18, 2016 00:13 IST