शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दुर्धर आजार अनुदानात २५ लाखांनी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:01 IST

दुर्धर आजारांवर उपचार घेणे सर्वसामान्य व्यक्तींना परवडत नाही. या रुग्णांना आजारांशी लढण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत दिली जाते. यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तरतूद केली जाते. त्यानुसार चालृू आर्थिक वर्षासाठी सुमारे ७५ लाख रुपयांची तरतूद केली होती. परंतु, ही तरतूद २५ लाखांनी कमी करण्याचा निर्णय आमसभेत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रशासनासमोर पेच : अर्थसंकल्पातील तरतूद घटविल्याने लाभार्थींमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कर्करोग, हृदय शस्त्रक्रिया आणि किडनी या आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात याकरिता बजेटमध्ये ७५ लाखांची तरतूद प्रशासनाने प्रस्तावित केली होती. मात्र, आमसभेत हा निधी २५ लाखांनी कमी केल्याने जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात नाराजीचे सुर उमटले आहेत. जिल्हाभरातील दुर्धर आजारी रुग्णांना आर्थिक मदतीचा हात देताना प्रशासन व पदाधिकाऱ्यांना यामुळे कसरत करावी लागणार आहे.दुर्धर आजारांवर उपचार घेणे सर्वसामान्य व्यक्तींना परवडत नाही. या रुग्णांना आजारांशी लढण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत दिली जाते. यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तरतूद केली जाते. त्यानुसार चालृू आर्थिक वर्षासाठी सुमारे ७५ लाख रुपयांची तरतूद केली होती. परंतु, ही तरतूद २५ लाखांनी कमी करण्याचा निर्णय आमसभेत घेण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सदर आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी आर्थिक साहाय्य मिळावे, याकरिता जवळपास ५५० प्रस्ताव प्राप्त झाले असून, अजूनही प्रस्तावांचा ओघ सुरू आहे. यापैकी पडताळणी अंतिम ग्रामीण भागातील ४०० रुग्णांचे प्रस्ताव अर्थसाहाय्यासाठी पात्र आहेत. परंतु, तोकड्या निधीतून पात्र ठरलेल्या लाभार्थींना लाभ देताना आरोग्य विभागाची कसरत होणार आहे. विशेष म्हणजे, सदर अर्थसाहाय्यासाठी पदाधिकारी व सदस्य यांच्याकडून लाभार्थ्याची शिफारस केली जाते. परंतु, अल्प तरतुदीत लाभ वेळेवर देण्यासाठी निधीअभावी मर्यादा येत असल्याने सदस्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. परिणामी दुर्धर आजारी रुग्णांसाठीच्या ७५ लाखांची तरतूद ‘जैसे थे’ ठेवावी, अशी मागणी सदस्यांमधून होत आहे. आता यावर सताधारी पक्ष काय निर्णय घेतो, याकडे सर्वा$ंचे लक्ष लागले आहे.एक हजारांवर लाभार्थींना मदतजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून कर्करोग, हृदय शस्त्रक्रिया आणि किडनी या आजाराच्या रुग्णांना उपचारासाठी जिल्हा परिषदेक डून आर्थिक साहाय्य दिले जाते. यामध्ये २०१४ ते २०१८-१९ पर्यंत सुमारे १ हजार ९० लाभार्थींना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली. यावर्षी आरोग्य विभागाकडे ५५० प्रस्ताव प्राप्त झाले. त्यामधून ४०० प्रस्ताव अनुदानास पात्र असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.आता दहा हजारांचा धनादेश?जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक साहाय्य म्हणून प्रत्येकी १५ हजाराची आर्थिक मदत दिली जाते. परंतु, अल्प तरतूदीमुळे यंदा लाभार्थींना १५ हजारांऐवजी पहिल्या टप्प्यात १० हजारांचा धनादेश देऊन उर्वरित पाच हजारांची रक्कम दुसऱ्या टप्यात देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. परिणामी निधी उपलब्ध होईपर्यंत दुसऱ्या टप्प्यासाठी लाभार्थींना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद