शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी १० लाखांचा निधी, अ‍ॅम्ब्युलन्समधील साहित्याची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 19:18 IST

१०८ अ‍ॅम्ब्युलन्सला लागणारे साहित्य खरेदीकरिता १० लाखांची निविदा प्रक्रिया करण्यास शासनाने ९ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

अमरावती : 13व्या वित्त आयोगातून अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी मंजूर अनुदानाच्या विनियोगासाठी नवीन कृती आराखड्यानुसार १०८ अ‍ॅम्ब्युलन्सला लागणारे साहित्य खरेदीकरिता १० लाखांची निविदा प्रक्रिया करण्यास शासनाने ९ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यातून अर्भक दर कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.राज्यातील अतिजोखमीच्या अहेरी, धारणी, चिखलदारा, पेठ व धडगाव या पाच तालुक्यांतील १०८ नंबरच्या प्रति तालुका दोन '१०८' अ‍ॅम्ब्युलन्स अपग्रेड करण्यासाठी बॅटरी आॅपरेटेड ट्रान्सपोर्ट, वॉर्मर, पल्स आॅक्सिमीटर, सीपॅप व कंज्युमेबल्स बाबींची खरेदी करण्यासाठी १० लाख रुपयांची प्रक्रिया करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी त्वरित संदर्भसेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आदिवासी भागातील भौगोलिक कार्यक्षेत्र विचारात घेता संदर्भ सेवा संस्थांपर्यंत पोहचण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे आठ ते दहा टक्के मृत्यू प्रवासादरम्यान होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असून हे मृत्यू टाळण्याकरिता राज्यातील अती जोखमीच्या पाच तालुक्यातील १०८ नंबरच्या प्रतीतालुका दोन अ‍ॅम्ब्युलन्समध्ये साहित्य लागते. ते खरेदी करणे अत्यंत आवश्यक असून त्याकरिता प्रशासकीय मान्यता मिळणे गरजेचे झाले आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती