शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लाल शाळेच्या आगीला घातपाताची किनार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:43 IST

नेहरू मैदान स्थित ९० वर्षे जुन्या लाल शाळेला लागलेली आगच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. महापालिकेच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी यात घातपाताची शक्यता वर्तवित उच्चस्तरीय चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्देबिल्डरांची नजर : सर्व स्तरावरून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नेहरू मैदान स्थित ९० वर्षे जुन्या लाल शाळेला लागलेली आगच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. महापालिकेच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी यात घातपाताची शक्यता वर्तवित उच्चस्तरीय चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली आहे. शहराच्या मध्यवस्तीतील या जागेवर बिल्डरांचा डोळा असल्याच्या पार्श्वभूमीवर घातपाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे.बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नेहरू मैदान स्थित शाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्रयोगशाळेला अचानक आग लागली. यात हा हॉल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या संपूर्ण इमारतीची संरचना लाकडी आहे. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. मोठ्या हॉलची चार दारे, आठ खिडक्या, दोन लाकडी आलमाºया, तीन लोखंडी आलमाºया याशिवाय संपूर्ण लाकडाचे छत भस्मसात झाले. रसायनांच्या बॉटल फुटल्याने आग अधिकच तीव्र झाली. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन पथकाने आग विझविली. अंबानगरीचे वैभव असलेली ही इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ही आग लावण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला.महापालिकेच्या नावे 'प्रापर्टी कार्ड' असलेल्या या मालमत्तेवर अनेक बिल्डरांचा डोळा आहे. आग लावून ही इमारत धोकादायक ठरवायची. आम सभेतून त्यावर शिक्कामोर्तब करायचे आणि आमसभेच्या माध्यमातूनच तेथे व्यावसायिक संकुलाचा मार्ग प्रशस्त करावा, असा एकूण घाट असल्याचा आरोप होत आहे. या अनुषंगाने महापौर संजय नरवणे आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेता बबलू शेखावत आगीच्या घटनेची उच्चस्तरीय व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.घातपाताचा संशय नाही, इमारत धोकादायकचनेहरू मैदान स्थित शाळेची ही इमारत धोकादायक बनली आहे. बुधवारी सायंकाळी लागलेल्या आगीमागे घातपाताची शक्यता नाही, मात्र, स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पवार यांनी दिली. तत्पूर्वी तेथील विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. इमारतीची अवस्था पाहता, या परिसरात कोणीही जाऊ नये, असा फलक लावण्यात येईल. आग शॉर्ट सर्कीटने लागली असावी, अशी शक्यता आहे. मात्र, नेमक्या कारणांची चौकशी उपायुक्त, अग्निशमन अधीक्षक व शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सुरु करण्यात आल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली.प्राथमिक अंदाजशाळा इमारतीमधील वायरिंग जुनी झाली आहे. याखेरीज ज्या हॉलमध्ये आग लागली, तेथे प्रयोगशाळा होती. रात्रीच्या सुमारास एखाद्या रासायनिक द्रव्याची बॉटल खाली पडली असावी. याशिवाय ऐतिहासिक इमारतीची मागील बाजू निर्मनुष्य असते. रात्रीच्या वेळी तेथे असामाजिक तत्त्वांचा राबता असतो. अशा तीन शक्यता अग्निशमन अधीक्षक भारतसिंह चौहान यांनी व्यक्त केल्या.आगीमुळे गुरुवारी विद्यार्थ्यांची शाळा नेहरू मैदानात भरविण्यात आली. या शाळेतील हिंदी बॉईजमध्ये १३०, गर्ल्स ११० व मराठी मुले १३७ शिक्षण घेत आहेत. येथे सहावी ते दहावीपर्यंत विद्यार्थी शिकायला आहेत.

टॅग्स :fireआग