शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आयकरदात्या शेतकऱ्यांकडून पीएम किसान निधीची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : आयकराचा भरणा करताना जिल्ह्यातील ५,७४५ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या  ५ कोटी १३ ...

ठळक मुद्देमहसूलने बजावल्या नोटिशी, ५.१३ कोटी वसूलपात्र, ३० हजारांचीच वसुली

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आयकराचा भरणा करताना जिल्ह्यातील ५,७४५ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या  ५ कोटी १३ लाख ७६ हजारांच्या निधीचा लाभ घेतला आहे. हा निधी परत घेण्यासाठी महसूल विभागाद्वारे तलाठ्यामार्फत आता या शेतकऱ्यांना निधी परत देण्यासाठी नोटीस बजावली आहे. केवळ धारणी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांच्या १५ हप्त्यांचे ३० हजार रुपये आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास परत मिळाले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. जिल्ह्यात या योजनेचे ३ लाख ३३ हजार ९११ लाभार्थी आहेत. या योजनेच्या आतापर्यंत दोन हजारांचे प्रत्येकी सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत लाभार्थी हा खरा शेतकरीच आहे, ही खातरजमा ऑनलाईन प्रक्रियेत झाली नसल्याने आयकर भरणाऱ्या ६ हजार ४१३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात साधारणपणे ५.१३ कोटी रुपये जमा झाल्याची बाब आात उघडकीस आली. महसूल विभागाद्वारा ही  रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय अनेक अपात्र शेतकऱ्यांच्याही खात्यात हे हप्ते जमा झाले आहेत. काही पात्र शेतकऱ्यांची मदत अन्य खात्यात जमा झाल्याच्याही तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. काही प्रकरणांत खातेदारांच्या मृत्यूनंतरही खात्यात निधी जमा झालेला आहे. यासाठी केंद्र शासनाने एसओपी पाठविली. त्यानुसार आता निधी परत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्याच्या कृषी आयुक्तालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना  जिल्हास्तरावर दिल्या आहेत.वसुलीची प्रक्रिया सुरूजिल्ह्यातील १४ तालुक्यांत आयकर भरत असताना योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नोटीस बजावणे व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सद्यस्थितीत धारणी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांकडून १५ हप्तांची ३० हजारांची रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. इतर तालुक्यांतही नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सद्यस्थितीत ४० टक्क्यांवर रक्कम तालुकास्तरावर वसूल करण्यात आली असली तरी जिल्हा कार्यालयात जमा करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

सात-बारावर बोजा चढविणारआयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील रकमेच्या वसुलीसाठी महसूल विभागाद्वारे फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटीस बजावल्या जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी असहकार्य केले, त्यांच्यावर आरआरसीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. न जुमानल्यास सात-बारावर बोजा चढविला जाणार आहे. बोजा कमी करण्याच्या वेळी सर्व रक्कम वसूल केली जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी