लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत विभागात आतापर्यंतचे विक्रमी असे अंदाजे ८२.९१ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यांची कारणमीमांसा वेगवेगळी केली जात असली तरी लढतीतील उमेदवारांचे हृदयाचे ठोके यामुळे वाढले आहेत. मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार, हे गुरुवारच्या मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.अमरावती विभागातील ७७ केंद्रांवर ३५,६२२ पैकी २१,८६५ पुरुष व ७,६६९ महिला अशा एकूण २९,५३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावित रिंगणातील २७ उमेदवारांना पसंतिक्रम दिला. त्यासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्यात सकाळी १० पर्यंत मतदानाची टक्केवारी १०.११ होती. ३६०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १२ पर्यंत ८९४५ मतदान व २५.११ टक्केवारी झाली. यावेळी मतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठ्या रांगा असल्याने टक्का वाढणार, हे निश्चित झाले. सविस्तर वृत्त/४
‘रेकार्डब्रेक’ 83 टक्के मतदान; उद्या मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST
अमरावती विभागातील ७७ केंद्रांवर ३५,६२२ पैकी २१,८६५ पुरुष व ७,६६९ महिला अशा एकूण २९,५३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावित रिंगणातील २७ उमेदवारांना पसंतिक्रम दिला. त्यासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्यात सकाळी १० पर्यंत मतदानाची टक्केवारी १०.११ होती. ३६०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १२ पर्यंत ८९४५ मतदान व २५.११ टक्केवारी झाली.
‘रेकार्डब्रेक’ 83 टक्के मतदान; उद्या मतमोजणी
ठळक मुद्देशिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेत, अमरावती जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी ७६