शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

धामणगावात भुईमुगाची विक्रमी आवक

By admin | Updated: May 20, 2016 00:13 IST

एकेकाळी कापसाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या येथील बाजारपेठेला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले आहे.

५३०० रू. दर : जळगाव, मलकापुरातील व्यापारी खरेदीसाठी दाखलधामणगाव रेल्वे : एकेकाळी कापसाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या येथील बाजारपेठेला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले आहे. यंदाच सुरू झालेल्या भुईमुगाच्या खरेदीला तब्बल ५ हजार ३०० रूपये भाव मिळाला आहे़ दररोज साडेतीन हजार पोत्याची आवक येथील बाजार समितीत होत आहे़धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी कपाशी, गहू, हरभरा, तूर तसेच अनेक धान्याची खरेदी करण्यात येते़ यंदा प्रथमच बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे यांच्या संकल्पनेतून भुईमूग खरेदीला सहा दिवसांपूर्वी सुरूवात झाली़ आज ५ हजार ३०० रूपये भाव भुईमुंगाला मिळाला आहे़ यवतमाळ, आर्वी, वर्धा, अमरावती, बाभुळगाव, देवळी, येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भुईमूंग विक्रीसाठी येथील बाजार समितीच्या यार्डवर आणला आहे़ तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा भुईमुगाचा पेरा मोठ्या प्रमाणात केला तर इतर ठिकाणावरील भुईमुगाची आवक वाढल्याने जळगाव, मलकापूर, यवतमाळ, नेर, अमरावती, वर्धा, नागपूर, येथील व्यापारी भुईमूग खरेदीसाठी आले आहेत़ इतर बाजार समितीच्या तुलनेत दररोज साडेतीन हजार पोत्यांची आवक येथील बाजार समितीत होत असून प्रत्येक ढिगाचा हर्ऱ्हास तोंडी बोलीप्रमाणे व अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे़ आगामी काळात उडीद, मुगाची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे व उपसभापती दुर्गाबक्षसिंह ठाकूर यांनी दिली़ (प्रतिनिधी)