शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रवी राणा यांना ट्रान्झिट अटकपूर्व जामीन; दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 20:03 IST

Amravati News नवी दिल्ली येथील पटियाला जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा यांना आठवडाभराचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांवरील शाईफेक, हल्ला प्रकरण

अमरावती : नवी दिल्ली येथील पटियाला जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा यांना आठवडाभराचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी आमदार रवी राणा व अन्य १० जणांविरुद्ध ९ फेब्रुवारी रोजी भादंविचे कलम ३०७ व अन्य कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवारदेखील होती. दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी त्यांना ‘ट्रान्झिट ॲन्टिसिपेट्री बेल’ मंजूर करण्यात आल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.            

न्यायालयाने त्यांना एक आठवड्यासाठी ट्रान्झिट जामीन मंजूर केला असल्याने या कालावधीत त्यांना राजापेठ पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज सादर करता येणार आहे. स्थानिक पोलिसांना त्यांना या कालावधीत अटक करता येणार नाही. पोलिसांनी कुहेतूने व राजकीय दबावापोटी दाखल केलेला एफआरआर स्क्वॅश करण्यासाठी आपण मंगळवारी नागपूर येथे जात असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी सोमवारी दिली. सोबतच आपण नागपूर खंडपीठात मानहानी दाव्याचा अर्जदेखील करणार असल्याचे त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओतून स्पष्ट केले आहे.

राजापेठ अंडरब्रिज परिसरात ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते १.१५ च्या सुमारास महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली होती. आपल्यावर जीवघेणा हल्ला चढविण्यात आला, अशी तक्रारदेखील आष्टीकर यांनी नोंदविली होती. गुन्हा दाखल झालेल्या ११ पैकी ५ जणांना घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली. तर अन्य एक आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर पोलिसांच्या लेखी आ. रवी राणा, तीन महिला व अजय मोरय्या यांना अटक झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आ. राणा यांनी पटियाला न्यायालयाकडे ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मागितला होता. त्यावर सुनावणी होऊन सोमवारी त्यांना प्रवासासाठी अटकपूर्व जामीन मिळाला.

 

मला अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे समजल्याने दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात अर्ज दिला. त्या न्यायालयाने सोमवारी मला आठवडाभराचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला. त्या जामिनावर मंगळवारी नागपूर न्यायालयात जाणार आहे.रवी राणा, आमदार, बडनेरा

आमच्यापर्यंत तशी कुठलीही ऑर्डर पोहोचलेली नाही. त्यामुळे ट्रान्झिट जामीन मिळाला की कसे, यावर भाष्य करता येणार नाही.भारत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा