शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अतिशय विषारी असलेल्या पोवळा या दुर्मिळ सापाची अमरावतीत नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 11:13 IST

अतिशय विषारी अशा पोवळा सापाची नोंद सर्पमित्रांनी अमरावती जिल्ह्यात घेतली आहे. दर्यापूर तालुक्यातील मांजुरडा या छोट्याशा गावात या सापाचे प्राण वाचवून सर्पमित्रांनी त्याला नजीकच्या जंगलात सोडले.

ठळक मुद्देसर्पमित्रांनी केली सुटकासापांना न मारण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतअमरावती : अतिशय विषारी अशा पोवळा सापाची नोंद सर्पमित्रांनी अमरावती जिल्ह्यात घेतली आहे. दर्यापूर तालुक्यातील मांजुरडा या छोट्याशा गावात या सापाचे प्राण वाचवून सर्पमित्रांनी त्याला नजीकच्या जंगलात सोडले.दर्यापूर तालुक्यातील गौरखेडा नजीकच्या मांजुरडा या गावात साप निघाला. काही जागरूक नागरिकांनी त्याला ठार करण्याऐवजी सर्पमित्रांशी संपर्क साधला. सर्पमित्र तुषार इंगोले यांनी सापावर लक्ष ठेवा, मात्र त्याला मारू नका, असे फोनवर सांगून ३० किलोमीटरवरील मांजुरडा गाठले. यानंतर सापाला पकडले. तो जहाल विषारी अशा पोवळा या अतिशय दुर्मीळ जातीचा होता.

शेपटीची गुंडाळी 

हा साप भीती दाखविण्यासाठी शेपटी गोल करून तांबूस-नारिंगी भाग दर्शवितो. त्याची लांबी ही सरासरी १४ इंच असते.रंगसंगतीचा अनोखा मेळपोवळा सापाचे शास्त्रीय नाव येट्राफाय फॉलिओफीस मेलेनुरूस आहे. लांबट-सडपातळ शरीर, शेपूट आखूड, डोक्यावर दोन पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि शेपटीखालील गुदद्वारापासून टोकापर्यंत त्वचा आकाशी रंगाची व त्यावर काळे ठिपके असतात.सापांना मारू नकातुषार इंगोले, चेतन अडोकार, अभिजित दाणी, मंगेश तवाळे, राम पावडे, ऋषी देशमुख आदी सर्पमित्र १० वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. साप कुठलाही असो, त्याला मारू नका, सर्पमित्राला सूचना द्या, असे आवाहन ते करतात.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव