शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
7
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
8
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
9
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
10
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
11
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
12
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
13
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
14
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
15
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
16
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
17
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
18
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
19
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
20
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

संविधान जाळणाऱ्यांविरुद्ध अमरावतीत तीव्र निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:24 PM

दिल्लीतील जंतरमंतर येथे संविधान प्रत जाळून मुर्दाबाद घोषणा देणाºयांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींनी शहरात प्रचंड निदर्शने केली. इर्विन चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून रोष व्यक्त केला. याशिवाय विविध ठाण्यांतील पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

ठळक मुद्देविविध ठिकाणी आंदोलने : इर्विन चौकात प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिल्लीतील जंतरमंतर येथे संविधान प्रत जाळून मुर्दाबाद घोषणा देणाºयांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींनी शहरात प्रचंड निदर्शने केली. इर्विन चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून रोष व्यक्त केला. याशिवाय विविध ठाण्यांतील पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या.९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे काही समाजकंटकांनी 'भारतीय संविधानाची प्रत जाळली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह घोषणा दिल्यात. हा सर्व प्रकार कॅमेराबद्ध करून व्हिडीओ देशभरात व्हायरल केला गेला. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याने यावर आक्षेप नोंदवून शहरात विविध संघटनांनी सोमवारी शहरात आंदोलनात्मक पावित्रा घेत घोषणाबाजी व निदर्शने केली. राजकमल चौक व इर्विन चौकातून शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी 'डिटेन' केले. इर्विन चौकात रस्त्यावरच प्रतिकारात्मक पुतळ्याचे दहन करणाऱ्यांना गाडगेनगर पोलिसांनी डिटेन केले. गाडगेनगर पोलिसांनी २१, तर राजकमल चौकात निदर्शने करणाऱ्या ३० जणांना कोतवाली पोलिसांनी 'डिटेन' केले. याशिवाय जिल्ह्याभरातील विविध ठाण्यांत निवेदने देऊन संविधान जाळणाऱ्यांविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला.इर्विन चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनअनुसूचित जाती-जमाती संविधान बचाव समितीतर्फे अमोल इंगळे, राजेश वानखडे, सुरेश तायडे, मनोज वानखडे, गौतम मोहोड, अश्विन उके, प्रवीण बन्सोड, राहुल भालेराव, संजय आठवले, मनोज मेश्राम, प्रशांत वाकोडे, किशोर सरदार, संजय थोरात, जितू रौराळे, अतुल चौरे, नितीन काळे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. संविधान जाळणाऱ्यांना तातडीने अटक करा, अन्यथा १७ आॅगस्टला जिल्हा बंदचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिला. आंदोलनकर्त्यांनी इर्विन चौकात सरकारचा प्रतिकारात्मक पुतळा जाळला.भीम आर्मीकडून मनुस्मृतीचे दहनभीम आर्मी संघटना व भारत एकता मिशनतर्फे इर्विन चौकात मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. संविधान जाळणाऱ्यांना अटक देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा व त्यांना फाशी द्या, अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी गाडगेनगर पोलिसांनी बंटी रामटेके, सुदाम बोरकर, प्रवीण बन्सोड, गौतम हिरे, सुरेंद्र काळे, कमलेश दंडाळे यांना डिटेन केले. तत्पूर्वी आंदोलनात मनीष साठे, शेख अकबर भाई, साजीद अली, राहुल ढोके, संदीप चव्हाण, अभिजित गोंडाणे, नितीन काळे, शुभम ढोके आदींचा सहभाग होता.जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदिल्लीत संविधान जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सोमवारी जिजाऊ ब्रिगेडने जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली. याप्रकरणी त्वरित तपास करून दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा जिजाऊ ब्रिगेड राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीला पाटील, मार्गदर्शक मयुरा देशमुख, कीर्तीमाला चौधरी, तेजस्विनी वानखडे आदींनी दिला.प्रहार आक्रमकसंविधान जाळणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी प्रहारने जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात जोगेंद्र मोहोड, सुधीर उगले, पिंटू सोळंके, नीलेश ठाकूर, चंदू उगले, इम्तियाज अहमद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.