शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राणांचा गनिमी कावा, पुराव्यांसह देशमुखांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:12 IST

भाजप शहराध्यक्ष तुषार भारतीय यांचे आव्हान स्वीकारून आ. रवि राणा पुरावे घेऊन पोहोचले, मात्र थेट आ. सुनील देशमुखांकडे. तुषार भारतीय हे नगरसेवक आहेत. मी आमदार आहे. त्यामुळे माझ्या तोडीचा, वकुबाएवढा माणूस द्या, मी पुरावे देतो, असे राणा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.

ठळक मुद्देतुषार भारतीय टिनपाट : माझ्या घरापुढे ‘बेशरम’ लावून दाखवाच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भाजप शहराध्यक्ष तुषार भारतीय यांचे आव्हान स्वीकारून आ. रवि राणा पुरावे घेऊन पोहोचले, मात्र थेट आ. सुनील देशमुखांकडे. तुषार भारतीय हे नगरसेवक आहेत. मी आमदार आहे. त्यामुळे माझ्या तोडीचा, वकुबाएवढा माणूस द्या, मी पुरावे देतो, असे राणा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. तिकडे तुषार भारतीय पत्रपरिषदेत राणा पळपुटे असल्याचा आरोप करीत असताना, इकडे आ. राणा आ. देशमुखांना पुरावे सादर करीत होते.कल्याणनगर ते यशोदानगर येथील रस्ता आ. रवि राणा यांनी मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला. त्याचे काम सुरू झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली. नगरसेवक तुषार भारतीय यांनी या रस्त्याचे श्रेय पालकमंत्र्यांना देत, राणांनी लुडबूड करू नये, असे बजावले होते. आ. राणा हे खोटारडे व पळपुटे आहेत. त्यांनी या रस्त्याच्या कामाबाबत आधी पुरावे द्यावे आणि नंतर श्रेय घ्यावे, असा शब्दबाण तुषार भारतीय यांनी मारला होता.निवडणूक कोण लढणार? शिवराय की भारतीय?धमक असेल, तर त्यांनी माझ्या घरासमोर रोपटे लावून दाखवावे. मी २ वाजता वाट बघतो. निवडणुकीची हवा तयार करण्यासाठी पत्रपरिषदेतून खोटे बोलले जात आहे. नेमके निवडणूक कोण लढणार, शिवराय की भारतीय, हे आधी ठरवा. एका नगरसेवकाला आमदाराने पुरावे सादर करावे काय? पालकमंत्री आले असते, तर जबाब देऊ शकलो असतो. पालकमंत्र्यांचाच आता भारतीय यांच्यावर विश्वास राहिला नाही. आ. सुनील देशमुख हे यापूर्वी पालकमंत्री राहिले आहेत. मला मिळालेला निधी हा राज्य शासनाचा आहे, महापालिकेचा नव्हे. त्यांचा या विषयावर अभ्यास आहे. विधानसभेतील ज्येष्ठ सहकारी म्हणून २०१६ पासून रस्त्याकरीता केलेल्या पाठपुराव्याचे पत्र आ. सुनील देशमुख यांना दाखविले. तुषार भारतीय यांना स्वत:चा प्रभाग संभाळता येत नाही. अशा टिनपाट नगरसेवकाने ही भाषा बोलू नये, असे आ. रवि राणा म्हणाले.आ. राणा माझ्याकडे आले. त्यांनी रस्त्यासाठी पाठपुरावा केल्याचे पत्र दाखविले. कुणाला निधी दिला, यासंदर्भाच्या दोघांच्या भूमिका मुख्यमंत्र्यांना माहिती आहेत. त्यामुळे तेच निर्णय देतील. हा विषय येथेच संपवावा, अशी विनंती मी दोघांना करेन.- सुनील देशमुख, आमदार

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा