शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

शिवरायांच्या पुतळ्यावरून रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 05:00 IST

शिवछत्रपतींचा पुतळा हटविण्यात आला, ही माहिती शिवप्रेमी, तरुणांना समजताच रविवारी सकाळपासूनच राजापेठ उड्डाणपुलावर गर्दी करण्याचा प्रयत्न झाला. चार दिवसांपूर्वी स्थापना करण्यात आलेला पुतळा हटविण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, राजापेठ पुलावर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे येथे कुणालाही थांबू दिले नाही. आमदार रवि राणा व त्यांच्या समर्थकांनी शनिवारी सायंकाळी शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक करून पूजाअर्चा केली, हे विशेष.

अमरावती येथे अज्ञातांनी रहदारीच्या राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतपणे बसविलेला पुतळा रविवारी पहाटे साडेतीनला पोलीस प्रशासनाने हटविला. जिल्हा कचेरीपुढे लागलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळादेखील रात्री दीड वाजता हटविण्यात आला. दुसरीकडे दर्यापुरातील पेट्रोल पंप चौकात अनेक वर्षांपासून परवानगी मिळत नसलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच सुमारास शिवसैनिकांनी स्थापित केला. या घटनांमुळे दोन्ही शहरांमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त लागला होता. पुतळा हटल्यास गंभीर परिणामांचा इशारा देणारे आमदार रवि राणा यांना नजरकैदेत ठेवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाभोवती पोलिसांचा गराडा पडला. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील राजापेठ उड्डाणपुलावर माँ जिजाऊंच्या जयंतीदिनी १२ जानेवारी रोजी शिवप्रेमींनी बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस प्रशासनाने रविवारी मध्यरात्री प्रचंड  बंदोबस्तात हटविला. तब्बल चार दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विनापरवानगी पुतळा हटविण्याची कार्यवाही केली.शिवछत्रपतींचा पुतळा हटविण्यात आला, ही माहिती शिवप्रेमी, तरुणांना समजताच रविवारी सकाळपासूनच राजापेठ उड्डाणपुलावर गर्दी करण्याचा प्रयत्न झाला. चार दिवसांपूर्वी स्थापना करण्यात आलेला पुतळा हटविण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, राजापेठ पुलावर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे येथे कुणालाही थांबू दिले नाही. आमदार रवि राणा व त्यांच्या समर्थकांनी शनिवारी सायंकाळी शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक करून पूजाअर्चा केली, हे विशेष.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून तमाम शिवप्रेमींनी राजापेठ उड्डाण पुलावर शिवरायांचा पुतळा बसविला. तीन वर्षांपासून ही मागणी होती. मात्र, महापालिका प्रशासनाने परवानगी न देता तो पुतळा हटविला, हा प्रकार निंदनीय आहे.- रवि राणा, आमदार

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवसेना राज्य करते. मात्र, त्याच महाराष्ट्रात शिवरायांचा पुतळा बसविण्यास मज्जाव केला जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात ही अराजकता का?, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.- नवनीत राणा, खासदार, 

राजापेठ उड्डाणपुलावरून रातोरात शिवरायांचा पुतळा हटविणे हा निर्णय राज्य सरकार आणि प्रशासनाचा आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी आयुक्तांनी घेतलेला निर्णय व कार्यवाहीची सूचना लोकप्रतिनिधींना नव्हती. - चेतन गावंडे, महापौर.

राणा दाम्पत्य नजरकैदेत : पुतळा हटविल्याची कार्यवाही झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना त्यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानी शनिवारी मध्यरात्रीपासून नजरकैदेत ठेवले आहे. राणा दाम्पत्याला घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. घरासमाेर मोठा बंदोबस्त होता. राज्य राखीव दल, दामिनी पथक, राजापेठ पोलीस विशेष शाखा बारकाईने नजर ठेवून होते. वज्रसह दंगलविरोधी वाहन तैनात होते.

महापालिकेत विशेष सभा घेण्याची मागणी

तीन वर्षांपासून पुतळा बसविण्याची मागणी शिवप्रेमी व तरुण कार्यकर्त्यांनी पूर्ण केली, असा दावा आमदार रवि राणा यांनी केला होता. तीन दिवसांपासून तेथे शहरातील शिवप्रेमींनी मोठी उपस्थिती लावली. हा पुतळा कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या बहाल करण्याची मागणी आमदार राणा यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती.

गोपनीय रणनीतीशिवरायांचा पुतळा हा विनापरवानगीने बसविला आहे, असा अहवाल महापालिकेने दिला. त्याअनुषंगाने शनिवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल आदींची बैठक झाली. या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. 

अण्णाभाऊंचा पुतळा बसवला अन् हटवलाछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा प्रश्न ऐरणीवर असताना मातंग समाज बांधवांनी रविवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास जिल्हा कचेरीसमोरील चौकात साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवला. मात्र, ही बाब पोलीस प्रशासनाच्या लक्षात येताच अण्णा भाऊंचा बसवलेला पुतळा काही क्षणातच हटविला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. दादासाहेब क्षीरसागर, डॉ. रूपेश खडसे, गणेशदास गायकवाड, पंकज जाधव, अनिल सोनटक्के, गणेश कलाणे, सुरेश गवळी आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती जाणून घेतली.

दर्यापुरात पुतळ्यावरून वातावरण तापले

छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत अनेक वेळा परवानगी मागूनही ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त शिवप्रेमींनी शिवसेना तालुका प्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात रात्री १० च्या सुमारास मोजक्या लोकांनी पेट्रोल पंप चौकात गांधी पुतळ्यासमोर नियोजित जागी अश्वारूढ पुतळ्याची स्थापना केली. ही वार्ता शहरात पसरताच शिवप्रेमी पोहोचले. प्रशासन मध्यरात्रीच घटनास्थळी दाखल झाले. अरबट यांच्यासह पाच ते सहा लोकांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले. 

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणा